Tag: Balasaheb Thakarey

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचे उद्घाटन
पिंपरी चिंचवड

हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचे उद्घाटन

पिपरी : हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त काळेवाडी शिवसेना शाखा नामफलकाचा उद्घाटन समारंभ रविवारी (ता. २३) काळेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डि-मार्ट जवळ संपन्न झाला. यावेळी शिवसेनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली, तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाचे नियोजन उपशहरप्रमुख हरेश आबा नखाते व शिवसेना काळेवाडी राहटणीच्या वतीने करण्यात आले. त्याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर, पिंपरी चिंचवड युवासेना अधिकारी विश्वजीत बारणे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, ज्येष्ठ शिवसैनिक बाबासाहेब भोंडवे, दिलीप भोंडवे, अल्पसंख्यांक सेलचे शहराध्यक्ष दस्तगीर मणियार, अधिकराव भोसले, ओंकार मुळे, प्रहारचे संजय गायखे, विकास काजवे, मा...