रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पूरग्रस्त बांधवाना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आणि सामाजिक संस्थासाठी थोडं महत्वाचं

रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील पूरग्रस्त बांधवाना मदत करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी आणि सामाजिक संस्थासाठी थोडं महत्वाचं

लोकमराठी : इन्स्पायर फाउंडेशनच्या माध्यमातून ३० जुलैला कोकणातील पोलादपूरला भेट देण्यात आली. या भेटीबद्दलचा वृत्तांत सांगत असतानाच, पोलादपूरला मदत देणाऱ्या राज्यभरातल्या सामाजिक, राजकीय संस्थाना फाउंडेशनतर्फे काही महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे.

१. आपण आणलेली मदत कोणाच्याही हाती देऊ नका, हवतर मदतीचा ट्रक, टेम्पो गावाच्या बाहेर ठेवून आधी गावात एक चक्कर मारून या आणि मगच मदत कोणाला द्यायची ती ठरवा.

२. आम्ही जे पाहिलं ते अतिशय भयानक अवस्थेतील चित्र की, सारखी सारखी काही मोजक्या ठिकाणीच मदत जात आहे. आणि उरलेले लोक अक्षरशः भीक मागल्यासारखे गयावया करत, जवळ येऊन गर्दी करत लोकांना मदत मागत आहेत.

३. महाड आणि बाजूच्या शहरात आणि शहराच्या बाहेर खूप घाण कचरा असल्यामुळे आता दुर्गंधी निर्माण झाली आहे त्याचाच परिपाक लेप्टोस्पायरसिस मध्ये बदलेल हे नक्की. त्याच मुळे ही दुर्गंधी टाळण्यासाठी लोक बाहेर बाहेर राहूनच मदत करीत आहेत कोणीही आत जाऊन मदत करताना दिसत नाही आणि म्हणूनच राजकीय लोक आणि इतर मंडळे ही अश्या लोकांना बाहेरच गाठून त्यांनी आणलेली मदत ही गोठवून ठेवण्याचे काम करीत आहेत.

४. आपण इतक्या ताकदीने, वेळ वाया घालवून इतके परिश्रम घेऊन मदत गोळा करतो, लोकही सढळ हाताने मदत करतात नंतर ही मदत इतके खड्डे, गचाळ रस्ते पार करून आपण महाडला पोहोचतो आणि इतक्या भयानक प्रवासामध्ये आपण कदाचित वैतागत असू आणि म्हणूनच आपण ती मदत कोणकडे तरी सहजच सुपूर्त करतो आम्हाला वाटत की, हे बरोबर नाही आणि अस असेल तर आपण मदत देणाऱ्यांची आणि आपली स्वतःचीही फसवणूक करतोय.

५. पोलादपूर मध्येही काही असे लोक सक्रिय आहेत जी जे ह्या मदतीवर टपून बसलेत आणि आपली मदत सहजच घेऊन आपल्या कडे ठेवत आहेत. याचाच परिपाक म्हणून रात्री 10 वाजले तरीही लोक हायवेवर उभे राहून गाड्यांना हाथ करून आधाश्यासारखी मदत मागत आहेत हे रात्रीच आमच्या डोळ्यांच्या समोरच विदारक चित्र आहे.

६. राज्यात आणि मुंबई, पुणे, नवी मुंबई, ठाणे येथे काही मोठे सामाजिक राजकीय आणि धार्मिक ठग आहेत ज्यांच्या कॉन्टॅक्ट मुळे लाखोंची मदत उभी राहते ती सगळी मदत अर्धी स्वतःच्या खिशात आणि अर्धी बरोबर पूरग्रस्तांना मदतीसाठी उभारलेल्या स्टॉल मध्ये जाऊन आपल्याच आप्तस्वकीयांना रीतसर पुरवली जाते, रातोरात संपर्क होतात, बरोबर line लागते आणि गोष्टी आपल्याच माणसांना मिळतात.

७. आम्ही संपूर्ण गाव फिरून, (पोलादपूर पासून २१ किलोमीटर आतमध्ये जाऊन जिथे रायगड जिल्ह्याची सीमा संपते आहे) तेथील सामाजिक कार्यकर्ते, स्थानिकांना, शिक्षकांना आणि सरकारी अधिकारी यांना प्रत्येक्ष भेटून हे सगळं लिहीत आहोत. त्यामुळे जर तुम्हाला मदतच करायची असेल आणि कोणतीही शहानिशा न करता कोणाच्याही हाती मदत सोपवायची असेल तर आमच्या Inspire Foundation ला मदत करा किंवा आपण गोळा केलेली मदत आम्हाला द्या आम्ही कोणताही विचार करता रोगराईची पर्वा न करता ती मदत गरजूंपर्यंत पोहचवू. (हे काम आम्ही कोरोनाच्या सुरवातीपासून करत आहोत).

८. आम्ही आमच्या सर्वेक्षणात काही ठिकाणे शोधली आहेत तिथे जाणे जिकरीचे असले तरी तिथे खूप जास्त वाईट आणि सामाजिक बहिष्कारासारखी अवस्था आहे ती ठिकाणे पुढीलप्रमाणे आहेत…

पोलादपूर पासून अति दुर्गम गावे ज्या ठिकाणी आदिवासी वस्ती व 20 km पोलादपूर पासून दूर असल्याने मदत मिळाली नाही अशी गावे खालील यादीत आपणास सादर करीत आहे

साखर आदिवासीवाडी, गोवेले, खांडज, ढवळे, खोपट, चांदके, वडाचा कोंड, आडावळे खुर्द., आडावळे बुद्रुक., एरंडवाडी, फोफलयाचा मुरा, चिखली, खडकवाडी

इथले लोक आजही मदतीच्या जवळ पोहोचले नाहीत ह्यांना केवळ शिजलेल अन्न मिळत आहे आणि उरलेली मलई राजकीय सामाजिक आणि वशीलेवाले लाटत आहेत.

९. आम्ही निवडलेल्या वरील वस्त्या ह्या एकंदरीत 1500 घरांच्या आहेत (अजून रीतसर यादी आलेली नाहीये) आपल्याला जर खरोखरीच महाड मध्ये मदत करायची असेल तर ह्या वस्त्या आणि नदीकाठची ही ठिकाणे इथेच मदत करावी ही कळकळीची विनंती.

१०. बाकी सुनील तटकरे आणि स्थानिक शिवसेना आमदार आणि केंद्र सरकारच्या आशीर्वादाने इतके चांगले स्वच्छ आणि गुळगुळीत रस्ते बनवल्या बद्दल आपल्या सर्वांचे आभार कसे आणि कुठून मानावेत हाच मोठा विषय आहे.

शेवटचं, आपल्याला आमचं हे निवेदन पटलं असेल तर आपणही या कामात संस्थेला मदत करावी ही विनंती.

संस्थेला मदतीचे डिटेल्स खालीलप्रमाणे:

Inspire Foundations Bank details :

Account_no – 72180100000044.

IFSC – BARB0VJBADL

Bank of Baroda

Branch – Badlapur Dist – Thane

#Gpay or #Phonepay 7678044677 or 9373443772.

टीप :

१. पोलादपूर मधल्या सुतारवाडी आणि केवनाळे दोन्ही मिळून 11 लोक मृत पावले होते त्यांच्या स्मृतीला अभिवादन करत असतानाच, या 11 जणांच्या बालिदानामुळे आज या दोन्ही गावात इतकी मदत आलीये की वर्ष दीड वर्ष पुरेल इतका साठा आज ह्या दोन्ही गावात आहे आणि आता त्याची साठेबाजी होतेय की काय अशी परिस्थिती आम्ही स्वतः डोळ्यांनी बघितली आहे. सुतारवाडी चे सरपंच मा. सुतार यांनी सुद्धा हे कबूल केले आहे की आता खूप मदत आलीये,

आणि म्हणूनच शहरातील शो शायनिंग करणाऱ्या सामाजिक राजकीय चमकेश युवाना आणि युवतींना आम्ही सांगू इच्छीतो की,

आंधळे पानाने, मीडियावर ऐकून बघून अंध भक्तांसारखं वागणं बंद करा आणि ज्यांच्या भरवश्यावर ही इतकी मोठी मदत आपण इथे आणली आहे ती शहनिषा न करता देत असाल तर तुमच्या सारखे शिकलेले परंतु हुकलेले अडाणचोट तुम्हीच असणार त्यामुळे जिथे लोक मरण पावले आहेत तिथे मदत करणं बंद करा आणि जिथे लोक मेले नाहीत म्हणून तिथली लोक खूप आनंदात आहेत या अविर्भावात सुद्धा राहू नका ही विनंती.

तरीही आपली समाजकारणाची हौस फिटत नसेल आमच्या #Inspire_Foundation ला संपर्क करा आम्ही न थकता न घाबरता आपली मदत शेवटच्या घटकाना देऊनच येऊ वरून तुमच्या style मध्ये फोटो काढून मदत तुम्ही दिली म्हणून तुमच्या नावाने अपलोड सुद्धा करून देऊ काळजी नसावी. बाकी आपण सर्व सुज्ञ आहात विचार करा आणि ठरवा.

आपलेच,

#InspireFoundation

7678044677