महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित | एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांची माहिती

महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित | एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र सरकारने माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित केले असल्याची माहिती, नॅशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी लोकमराठीला दिली.


एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने सुरक्षा कवच देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यात सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींचा समावेश असावा हे महत्त्वाचे होते. मुंबईत ५३ मिडिया कर्मी कोरोना बाधित निघाले तेव्हाच एनयुजे महाराष्ट्रने एक व्हिडियो जारी करून एक कोटीचे संरक्षण विमा कवच सरकारकडे मागितले होते.

अगदी कोरोना टाळेबंदीच्या सुरवातीलाच प्रसार माध्यम व्यवस्थापन व मालकांनी कर्मचाऱ्यांना पूर्ण सुरक्षेची काळजी घेण्याचे व तसे आवाहन सरकारने करण्याचे निवेदन दिले होते. मात्र जेव्हा मुंबईत ५३ जन कोरोना पाँझिटिव निघाले तेव्हा देशभरातील मिडिया जगत हादरले. तेव्हा या प्रकरणी माध्यमकर्मी बाधित कसे झाले, याची चौकशी व्हावी तसेच १ कोटीचे विमा संरक्षण देण्याची मागणी केली होती.

सरकारने खूप उशीरा पत्रकार कोरोना वीर घोषीत केले. आज कोरोना मृत्यूनंतर माध्यमकर्मींना ५०लाखाचे विमा संरक्षण माननीय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जाहीर केले आहे. अशी माहिती शीतल करदेकर, अध्यक्ष नॅशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र संलग्न : एनयुजे इंडिया,नवी दिल्ली सदस्य : इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टस्, ब्रुसेल्स यांनी दिली.