लग्नाचा खर्च टाळून कोरोना संरक्षणासाठी केले होमिओपॅथिक गोळ्यांचे वाटप

ताज्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो कराफेसबुक |ट्वीटर |युट्यूब |


पुणे : लग्न म्हटलं की थाटमाट आलाच. मात्र, एका तरूणाने अनावश्यक खर्चाला फाटा देत, नागरिकांचे कोरोनापासून संरक्षण होण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी Arsenic Album 30 या होमिओपॅथिक गोळ्यांचे मोफत वाटप केले.


सचिन बडे असे या तरूणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील आपल्या मुळ गावी ज्ञानोबा चोले यांची मुलगी राजकन्या हीच्याशी नुकताच त्याचा विवाह झाला. या विवाहाला मुला -मुलीकडील मोजकेच नातेवाईक उपस्थित झाले होते.

कोरोना या महामारीमुळे संपुर्ण देश ठप्प झाला आहे. कोरोना विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी प्रतिकारशक्ती हा महत्त्वाचा घटक मानला जात आहे. त्याच अनुशंगाने आयुष मंत्रालयाने आर्सेनिक हे होमिओपॅथिक औषध प्रतिकारशक्तीसाठी सुचवले आहे.

आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेने बडे यांनी श्री धनंजय मुंडे युवा मंचच्या माध्यमातून पिंपरी चिंचवड शहरामधील सुमारे पाचशे गरजू नागरिकांना गोळ्यांचे वाटप केले. मंचचे कार्यकर्ते विजय वडमारे यांनी नागरिकांच्या घरोघरी जाऊन या गोळ्यांचे वाटत केले. दरम्यान, बडेंच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे. याबाबत वडमारे म्हणाले की, “या गोळ्यांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होत असली तरी इतर नियमही पाळणेही गरजेचे आहे.”