Tag: NUJM

माहिती व जनसंपर्क खात्यामुळेच जनहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचू शकतात | जीवनगौरव विजेत्या वीणा गावडे यांनी व्यक्त केली कृतज्ञता
महाराष्ट्र

माहिती व जनसंपर्क खात्यामुळेच जनहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचू शकतात | जीवनगौरव विजेत्या वीणा गावडे यांनी व्यक्त केली कृतज्ञता

मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामुळेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री म्हणजेच राज्यकर्त्यांपर्यंत पोहोचता येते आणि त्या माध्यमातून लोकहिताचे निर्णय जनते पर्यंत पोहोचविता येतात. मला या विभागात काम करण्याची संधी मिळाली आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री यांच्या समवेत चर्चा करण्याचा, त्यांची, पर्यायाने सरकारची भूमिका जनतेसमोर सादर करण्याची संधी मिळाली. या माझ्या कार्याची नोंद घेऊन धडाकेबाज अशा शीतलताई करदेकर यांनी एनयुजे, महाराष्ट्र या लढाऊ संघटनेमार्फत मला जीवनगौरव पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार माझ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचाच आहे असे मी मानते, अशा शब्दांत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवानिवृत्त वरिष्ठ सहाय्यक संचालक श्रीमती वीणाताई गावडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. एनयुजेने जीवनगौर...
एनयुजे महाराष्ट्र अधिवेशन व गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांचा होणार गौरव
मोठी बातमी, महाराष्ट्र

एनयुजे महाराष्ट्र अधिवेशन व गौरव सोहळ्यात विविध मान्यवरांचा होणार गौरव

ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी व जनसंपर्कासाठी वीणा गावडे यांना जीवनगौरव! मुंबई : एनयुजे इंडिया नवी दिल्ली संलग्न व आयएफजे, ब्रुसेल्स सदस्य नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्रचे राज्यस्तरीय अधिवेशनव गौरव सोहळा २४ डिसेंबर रोजी सुरेंद्र गावस्कर सभागृह ,मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय दादर पूर्व येथे सकाळी साडेदहा ते एक या कालावधीत संपन्न होणार आहे. या वेळी खासदार शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांच्या विशेष उपस्थितीत संपन्न होणाऱ्या या गौरव सोहळ्याचे अध्यक्ष दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत असणार आहेत. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष सांस्कृतिक, आरोग्य राज्य मंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर असुन पत्रकारांसह, जनसं...
संतापजनक : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने जालन्यातील पत्रकारांवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र, मोठी बातमी

संतापजनक : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने जालन्यातील पत्रकारांवर गुन्हे दाखल

पत्रकारांना हेतुपुरस्सर गुन्ह्यात अडकावणाऱ्या पोलीस अधिकारी व प्रदुषण महामंडळ अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई कारवाईची एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्र्यांकडे मागणी जालना : प्रदुषणाची बातमी प्रसिद्ध केल्याने येथील दैनिक गोकुळनीतीचे संपादक अर्पण गोयल, दैनिक तात्काळ राज्यवार्ताचे संपादक भरत मानकर यांचेसह चार पत्रकारांवर गुन्हे दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आकसाने गुन्हे दाखल केल्याबद्दल जालन्यासह राज्यभरातील पत्रकारांनी या कृत्याचा कठोर निषेध केला आहे. हा लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील अत्याचार असून ज्यांनी हे चुकीचे कृत्य केले आहे. त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, तसेच जालन्यातील प्रदुषण तातडीने थांबवावे अशी आग्रही मागणी नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित | एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांची माहिती
महाराष्ट्र

महाराष्ट्र सरकारचे माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित | एनयुजे महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांची माहिती

मुंबई : महाराष्ट्र सरकारने माध्यमकर्मींना ५० लाखाचे सुरक्षा कवच घोषित केले असल्याची माहिती, नॅशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् महाराष्ट्रच्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी लोकमराठीला दिली. एनयुजे महाराष्ट्रच्या वतीने सुरक्षा कवच देण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यात सर्व प्रकारच्या माध्यमकर्मींचा समावेश असावा हे महत्त्वाचे होते. मुंबईत ५३ मिडिया कर्मी कोरोना बाधित निघाले तेव्हाच एनयुजे महाराष्ट्रने एक व्हिडियो जारी करून एक कोटीचे संरक्षण विमा कवच सरकारकडे मागितले होते. अगदी कोरोना टाळेबंदीच्या सुरवातीलाच प्रसार माध्यम व्यवस्थापन व मालकांनी कर्मचाऱ्यांना पूर्ण सुरक्षेची काळजी घेण्याचे व तसे आवाहन सरकारने करण्याचे निवेदन दिले होते. मात्र जेव्हा मुंबईत ५३ जन कोरोना पाँझिटिव निघाले तेव्हा देशभरातील मिडिया जगत हादरले. तेव्हा या प्रकरणी माध्यमकर्मी बाधित कसे झाले, याची चौकशी व्हावी ...
कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मिडियावर कठोर कारवाई करा; एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी
महाराष्ट्र, मोठी बातमी

कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी न घेणाऱ्या मिडियावर कठोर कारवाई करा; एनयुजे महाराष्ट्रची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमराठी न्यूज नेटवर्क मुंबई : सध्या स्थितीत सर्व अत्यावश्यक सेवा कोरोनाविरोधात एखाद्या योद्याप्रमाणे लढत आहेत. इतर सर्वाना सुरक्षा कवच आहे. सरकार काळजी घेत आहे. मात्र, यातून लोकशाहीचा चौथा स्तंभ दुर्लक्षित राहिलाय. शासनाने कामगार हिसाठी अध्यादेश काढून निर्देश जारी केलेत. तरीही प्रसारमाध्यमकर्मी पुरेसे सुरक्षित नाहीत. काही पत्रकारांना या विषाणूची बाधा झाल्याच्या बातम्या पसरू लागताच उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी सक्रीय पत्रकारांची कोविड-१९ चाचणी करण्याची मागणी केली आहे. पण ही तपासणी पुरेशी नाही. यासोबत सर्व प्रसारमाध्यम व्यवस्थापन मालकांना खडबडून जागे करण्याची आणि जे मालक व व्यवस्थापन, वरिष्ठ माध्यम कर्मचारींच्या सुरक्षेत हयगय करत असतील आणि बातम्यांसाठी चुकीचा आग्रह धरत असतील अशांवर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी एनयुजे महाराष्ट्रने केली आहे. याबाबत अध्यक्ष शीतल करदेकर यांनी ...