लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र देवून पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मान

लोणावळा, दि.१३ (लोकमराठी) – लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र व पुष्पगुष्छ देवून हॉटेल चंद्रलोक येथे पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला.

पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा एक महत्त्वाचा कणा आहे. प्रामुख्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील करीत असतो. गाव पातळीवर कोणतेही काम असू दे सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पोलीस पाटील असतो. म्हणून अशा पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी (आयपीएस) सत्य साई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी पोलीस पाटील संजय जाधव,पोलीस पाटील शहाजहान इनामदार,पोलीस पाटिल ह.भ.प अनंता शिंदे, पोलीस पाटिल अनिल पडवळ, पोलीस पाटिल राहुल आंबेकर, पोलीस पाटील गुरुनाथ मांडेकर, पोलीस पाटील विनोद बेंगळे, पोलीस पाटील दिपाली विकारी, पोलीस पाटील उज्वला अंभोरे, पोलीस पाटील सचिन भोरडे, पोलीस पाटील अनंता खैरे, पोलीस पाटील नामदेव डोंगरे, पोलीस पाटील सीमा यादव, पोलीस पाटील राजश्री कचरे, पोलीस पाटील वैशाली काळे, पोलीस पाटील अर्चना येवले,पोलीस पाटील प्रतीक पिंगळे, पोलीस पाटील मयूर गरुड, पोलीस पाटील मीरा खांडेभरड, पोलीस पाटील नीता शिंदे, पोलीस पाटील सुनील कालेकर, पोलीस पाटील साबळे, पोलीस पाटील रुपाली पटेकर आदी सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.

पोलीस पाटलांबरोबरच पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थी यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

जिल्हा परिषद सदस्य गणेश धानिवले यांनी मनोगत व्यक्त केले. आयपीएस अधिकारी सत्यसाई कार्तिक साहेब, किशोर धुमाळ यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.

यावेळेस पत्रकार विशाल पाडाळे ,विशाल विकारी, संदीप मोरे, बंडू येवले, संदीप पाटील आदी पत्रकार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्राचार्य बापूलाल तारे यांनी केले. तर या कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोलीस हवालदार नितेश कवडे , धनवे आदींनी परिश्रम घेतले.