Tag: #topnews

रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
महाराष्ट्र

रिपब्लिकन पक्षाच्या  महाराष्ट्रातील कामगीरीकडे देशाचे लक्ष – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.२३. (लोकमराठी) - देशभरात रिपब्लिकन पक्षाचे संघटन वाढत आहे. ईशान्य भारतात रिपब्लिकन पक्षाला राजकीय यश लाभत आहे. नुकत्यात झालेल्या नागालँड विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे दोन आमदार निवडुन आले. देशभरात रिपब्लिकन पक्षाच्या नावाची चर्चा झाली. त्यामुळे  येणा-या मुंबई महानगरपालिका आणि राज्यातील विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष किती जागांवर विजय मिळवतो . आगामी काळेात महाराष्ट्रात रिपब्लिकन पक्ष काय राजकिय कामगिरी करणार याकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे  रिपब्लिकन कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांत आपले उमेदवार निवडुन आणण्याची कामगिरी करून दाखवावी, असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.  गोराई येथील हॉटेल बेव्हयु सभागृहात आमचे रामदास आठवले या गीताच्या  ध्वनीचित्रफितीचे ना.रामदास आठवले ...
मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.
पुणे

मावळातील वेहेरगावात मूक पदयात्रेद्वारे छत्रपतींचे स्मरण.

लोणावळा, दि.२२ (लोकमराठी) - धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा ३३४ वा स्मृतीदिन धर्माप्रति बलिदान दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्त वेहेरगाव येथे विविध कार्यक्रम पार पडले. धर्मवीर बलिदान मास फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन वद्य अमावस्या आंग्ल दिनांक २१ फेब्रुवारी ते २१ मार्चया महिन्याच्या कालावधीमध्ये वेहेरगाव गावामध्ये शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने महिला व ग्रामस्थ सातत्याने माता भगिनी, धारकरी, लहान मुले- मुली यांनी रोज एकत्रित येऊन संध्याकाळी ७ ते ८ वाजेपर्यंत धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांना दररोज श्रद्धांजली अर्पित केली. दि. ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त सर्व माता भगिनी यांना रायगड दर्शन करून आणण्यात आले. या कालावधीमध्ये धर्मजागर करण्यासाठी संप्रदाय क्षेत्रातील,शिवचरिकार यांना आमंत्रित करून त्यांनी धर्मावर सुंदर असे मार्गदर्शन केले. यामध्ये सातत्याने महिनाभर वेह...
मावळ येथे “सौभाग्यवती २०२३ ” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड कार्यक्रम उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी, पुणे

मावळ येथे “सौभाग्यवती २०२३ ” खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड कार्यक्रम उत्साहात संपन्न

मावळ, दि.१६ (लोकमराठी) - पुणे (ता.मावळ) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत भाजपा महिला आघाडी, भाजपा मावळ तालुका महिला अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे व नाणे मावळ भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने "सौभाग्यवती २०२३ " खेळ रंगला महिलांचा तसेच सुषमा स्वराज ॲवार्ड ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्‍घाटन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब, माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, जिल्हा अध्यक्ष गणेशतात्या भेगडे तालुका अध्यक्ष रवींद्र भेगडे , दूध संघाचे डायरेक्टर बाळासाहेब नेवाळे, राजमाता जिजाऊ महिला मंचच्या अध्यक्षा सारिका संजय भेगडे, लोनावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष सुरेखाताई जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधरजी पुजारी, बाळासाहेब घोटकुले यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महिलांना ...
वडगाव शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत चालू करा ; वडगाव मावळ महिला मोर्चाचे निवेदन..
पुणे

वडगाव शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत चालू करा ; वडगाव मावळ महिला मोर्चाचे निवेदन..

वडगांव मावळ, दि.१५ (लोकमराठी) - वडगाव शहरातील बंद पडलेली सीसीटीव्ही यंत्रणा पूर्ववत सुरू करावी, अशा मागणीचे निवेदन वडगाव मावळ भाजप महिला आघाडी अध्यक्षा धनश्री भोंडवे यांनी महिला मोर्चाच्या वतीने वडगाव नगरपंचायत तसचे वडगाव पोलिस स्टेशन यांना दिले. वडगाव शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन,तसेच अनेक शासकीय कार्यालये असल्यामुळे वडगांव शहरात नागरिकांची वर्दळ वाढत आहे. या गर्दीचा गैरफायदा घेऊन चोऱ्या, वाटमारी, छेडछाड असे अनेक प्रकार सर्रास होतं आहेत. तसेच अनेक ठिकाणे ही नशापान करण्याची केंद्रे बनत आहेत व याचा समस्त वडगावकर नागरिकांस मनस्ताप सहन करावा लागत आहे. महिलावर्ग भीतीच्या छायेखाली वावरत आहे. या सर्व लांछनास्पद गोष्टींना आळा बसावा यासाठी वडगाव शहर भाजपा महिला मोर्चा ने शहरात सर्व वर्दळीच्या तसेच प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अथवा असलेले कार्यान्वित करावेत, अशी आग्रही मागण...
लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र देवून पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मान
पुणे

लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र देवून पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थ्यांचा सन्मान

लोणावळा, दि.१३ (लोकमराठी) - लोणावळा ग्रामीण पोलीस ठाणेच्या वतीने प्रमाणपत्र व पुष्पगुष्छ देवून हॉटेल चंद्रलोक येथे पोलिस पाटिल, पोलीस मित्र, सिक्युरिटी एनएसएस विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. पोलीस पाटील हा गाव पातळीवरचा एक महत्त्वाचा कणा आहे. प्रामुख्याने गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था, शांतता प्रस्थापित करण्याचे काम पोलीस पाटील करीत असतो. गाव पातळीवर कोणतेही काम असू दे सेवेसाठी सदैव तत्पर असणारा पोलीस पाटील असतो. म्हणून अशा पोलीस पाटील यांच्या कार्याची दखल घेऊन लोणावळा विभागाचे उपविभागीय अधिकारी (आयपीएस) सत्य साई कार्तिक, लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या वतीने लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील व पोलीस मित्र यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस पाटील संजय जाधव,पोलीस पाटील शहाजहान इनामदार,पोलीस पाटिल ह....
डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन
पिंपरी चिंचवड

डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन

पिंपरी, दि.३१ (लोकमराठी) - डॉ . डी. वाय पाटील आयुर्वेद रुग्णालया मार्फत मोफत विशेष सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर डॉ . डी. वाय पाटील विद्यापीठ ,पुणे संलग्नित डॉ . डी. वाय पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद , हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर , पिंपरी पुणे येथे दि. १ फेब्रुवारी (बुधवार) रोजी ते २० फेब्रुवारी (सोमवार) २०२३ पर्यंत मोफत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराची वेळ स.९ ते दु. ४ वा. पर्यंत असेल. रविवारी सुट्टी राहील. कृपया रुग्णांनी याची नोंद घ्यावी. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून संधिवात, आमवात, पक्षघात, वातरक्त, मधुमेह, दमा, केस गळणे,- पांढरे होणे, रक्तदाब, लठ्ठपणा, सर्व प्रकारच्या पंचकर्म चिकित्सा -सल्ला मार्गदर्शन , बालपक्षघात, पोटदुखी, जन्तांचा त्रास, लहान मुलांमधील त्वचा विकार, मुलांचे वजन न वाढणे- भूक न लागणे , शय्यामूत्रता (अंथरुणात लघ...
कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे आणि विकत घेणाऱ्या आरोपीस अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पुणे

कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे आणि विकत घेणाऱ्या आरोपीस अटक; पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मावळ, दि.३० (लोकमराठी) - मावळ तालुक्यातील कामशेत येथील व्यवसायिकाचा डंपर चोरी करणारे तीन आरोपी आणि विकत घेणाऱ्या आरोपीला पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. डंपर चोरणारे विष्णू भगवान जाधव (रा. गोळेवाडी तळेगाव दाभाडे), ड्रायवर अमोल चौगुले , कृष्णा सीताराम देवकर (वय २५ रा. मुलुंड जि. ठाणे) आणि विकत घेणारा रवी अंकुश लष्कर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार; कामशेत पोलीस स्टेशन गु.र.नं २५६/२०२२ भादवि कलम ३७९ नुसार दाखल झाला होता. विजय विठ्ठल गायकवाड वय ४८ रा.कांब्रे ता.मावळ जि. पुणे यांनी फिर्याद दिली की; दि.२९/१२/२०२२ रोजी रात्री माझा पुतण्या रोशन गायकवाड याचे मालकीचा डंपर क्र.MH 46 F 4857 हा टायर पंक्चर झाल्यामुळे पुणे मुंबई हायवे लगत कामशेत येथील HP पेट्रोल पंपावर डंपर वरील...