अवैध पार्कींग करणाऱ्यांवर कारवाईची व देहूरोड फाट्यावर सिग्नल बसविण्याची मागणी
पिंपरी दि.१२( लोकमराठी) - देहूरोड पोलिस स्टेशन समोर देहूरोड फाट्यावर सिग्नल बसवण्याबाबत, तसेच नियमबाह्य वाहतूक व्यवसाय आणि पार्किंग प्रायव्हेट लक्झरी बसेसवर कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांनी सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) पिंपरी चिंचवड सतिश माने यांना निवेदन दिले आहे.
सोमाटणे टोल नाका जवळील देहूरोड पोलिस स्टेशन समोरील देहूरोड फाट्यावर सिग्नल नसल्यामुळे वाहतुक पोलिस मित्रांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे इथे लवकरात लवकर सिग्नल बसवून वाहतुक पोलिसांना तसेच नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती बेल्हेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
देहूरोड फाटा येथे वाहतूक पोलिसांसाठी कॅबीन नसल्यामुळे
वाहतूक पोलिसांना भर उन्हात वाहतुक सुरूळीत करण्यासाठी थांबावे लागते. त्यामुळे देहूर...