पिंपरी दि.१२( लोकमराठी) – देहूरोड पोलिस स्टेशन समोर देहूरोड फाट्यावर सिग्नल बसवण्याबाबत, तसेच नियमबाह्य वाहतूक व्यवसाय आणि पार्किंग प्रायव्हेट लक्झरी बसेसवर कारवाई करण्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) वाहतूक आघाडीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख शशिकांत रघुनाथ बेल्हेकर यांनी सहायक पोलिस आयुक्त (वाहतूक) पिंपरी चिंचवड सतिश माने यांना निवेदन दिले आहे.
सोमाटणे टोल नाका जवळील देहूरोड पोलिस स्टेशन समोरील देहूरोड फाट्यावर सिग्नल नसल्यामुळे वाहतुक पोलिस मित्रांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे इथे लवकरात लवकर सिग्नल बसवून वाहतुक पोलिसांना तसेच नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती बेल्हेकर यांनी पत्राद्वारे केली आहे.
- देहूरोड फाटा येथे वाहतूक पोलिसांसाठी कॅबीन नसल्यामुळे
वाहतूक पोलिसांना भर उन्हात वाहतुक सुरूळीत करण्यासाठी थांबावे लागते. त्यामुळे देहूरोड फाट्यावर कॅबिन बसवण्यात यावी.
- देहूरोड फाट्यावर सिग्नलला सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावेत. जेणेकरून नियम मोडणाऱ्या मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करण्यास सोपे पडेल.
- संपूर्ण पिंपरी -चिंचवड शहरात प्रायव्हेट लक्झरी बसेस नियमबाह्य वाहतूक व्यवसाय पार्किंग ही रस्त्यावर होत आहे. परिणामी वाहतूक कोंडी होत आहे.
- पिंपरी-चिंचवड शहरात वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवुन – कसल्याही प्रकारची परवानगी नसताना बेकायदेशीर रित्या रस्त्यावरच वाहन पार्कींग व्यवसाय केली जाते. परिणामी वाहतूक जाम होत आहे आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. – प्रायव्हेट लक्झरी बसेस व्यवसाय बेकायदेशीर पार्कंगमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. कोणतीही पार्कींगची सोय न करता पार्किंगची समस्या निर्माण करणाऱ्या प्रायव्हेट लक्झरी बसेस व्यवसाय करणाऱ्या वाहनांवर तसेच शहरात अनेक ठिकाणी बेशिस्त वाहनांवर त्वरित कारवाई करा.
असे निवेदन वाहतूक पोलिस आयुक्तांना सादर करण्यात आले आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आरपीआय वाहतूक आघाडी अजीजभाई शेख, पश्चिम महा. संपर्क प्रमुख शशिकांत बेल्हेकर, मा नगरसेवक हमीदभाई शेख, पिंपरी-चिंचवड अध्यक्ष सदाशिव तळेकर आदी वाहतुक आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.