
पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – शिवराज नगर, रहाटणी येथील श्री स्वामी समर्थ अनंत मठ, मुख्य शक्तिपीठाचे संस्थापक सद्गुरु अनंत पोतदार महाराज यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त द्वैत अद्वैत संगम तथा भक्ती शक्ती संगम सोहळा संपन्न झाला. या द्वैत अद्वैत संगम सोहळ्यासाठी अनंत पोतदार महाराजांनी स्थापन केलेल्या दौंडज, काळेवाडी, वासुंदे व गुंजाळवाडी येथील श्री स्वामी समर्थ अनंत मठ, शक्तिपीठांचे मुख्य कार्यवाह सपत्नीक उपस्थित होते. चारही शक्तिपीठांचे मुख्य कार्यवाह व इतर शेकडो स्वामी भक्त या सोहळ्यासाठी उपस्थित होते.
या सोहळ्या प्रसंगी पहाटे श्री स्वामी समर्थांची मूर्ती व सद्गुरु अनंत पोतदार महाराजांच्या समधीला वेद मंत्रोच्चारात सर्व प्रथम गुरू माऊली काकींच्या शुभ हस्ते व अनंत मठाच्या सेवक संघाच्या सदस्यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला. त्या नंतर योगेश बोरले यांनी सपत्नीक सर्व शक्तिपीठांच्या स्वामी पादुकांचे औक्षण करून मुख्य शक्तिपीठात स्वागत केले. वेद शास्त्र संपन्न देवळे गुरुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्व पादुकांचे धार्मिक विधिविधान करून पूजन केले. या प्रसंगी दत्तायाग-स्वामी याग करण्यात आला.
मुख्य शक्तीपीठ शिवराजनगर, रहाटणी या मुख्य शक्तीपीठातील व इतर चारही शक्तीपीठातील शेकडो स्वामी भक्त व सद्गुरु अनंत पोतदार महाराज भक्तांनी गुरुमाऊली पोतदार काकींचे पाद्यपूजन केले. या प्रसंगी संपन्न झालेल्या होमहवन व यागांत ऋषिकेश थोरात, निलेश चौधरी, गणेश गायके, भुजबळ काका, शाम वाबळे, किरण भागवत, संतोष गायके यांनी सपत्नीक सहभाग घेतला व सर्व धार्मिक विधिविधान संपन्न केले.

“द्वैत अद्वैत संगम” सोहळ्याच्या निमित्ताने अनंत मठात दिवसभर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात महिला भजनी मंडळाने सुश्राव्य गायनाने भकीमय वातावरण निर्माण करून आपली सेवा अर्पण केली.
संध्याकाळच्या पर्वात चारही शक्तीपीठातील “दिव्य स्वामी पादुकांना” त्यांच्या द्वैत प्रवासासाठी पुढील वर्षीच्या “अद्वैत संगमा” पर्यंत गुरू माऊली सुनीता पोतदार काकी व मीना पंडित मावशी यांच्यासह अनंत मठ, मुख्य शक्तीपीठ, रहाटणी सेवेकरी संघ व सर्व स्वामी भक्तांतर्फे मंत्रोच्चाराच्या घोषित निरोप देण्यात आला.
या अभूतपूर्व सोहळ्याच्या संपन्नते साठी गुरुमाऊली काकी यांच्या मार्गदर्शनात विद्या पोतदार – पंडित, ज्ञानदेव बोरोले, बाळकृष्ण चाकणकर, विजय वसगडेकर, अंकुश गवांदे, योगेश बोरोले, राहुल पाटील, विवेक वसगडेकर, माऊली गोपनर, हितेश पाटील, प्रियांक भुजबळ, महेश सोमवंशी, निलेश बोथरा, भारत बोथरा, सचिन पवार, निलेश चौधरी, श्रद्धा पवार, निलेश चाकणकर, खन्नू सेठ, भोला काटे, अन्नपूर्णा मावशी, शंकर वाल्हे काका, महादेव सगर, वैभव रुपनर, किशोर नारखेडे, नारायण भिसे, स्वप्नील थोरात, शिवराज काटे, अनिकेत दाभोळे, सत्यम खंडागळे, दीपा मुसळे, अविनाश गवांदे, तेजस गवांदे आदींनी अथक परिश्रम घेतले. “द्वैत अद्वैत संगम” सोहळ्या प्रसंगी विविध राज्यासह महाराष्ट्रातील सद्गुरु अनंत पोतदार महाराजांचे हजारो शिष्य व भक्त परिवार उपस्थित होता.