अग्निशमन दल व वाईल्ड एनिमल्स स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीने दिले कुत्र्यांना जीवनदान

अग्निशमन दल व वाईल्ड एनिमल्स स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीने दिले कुत्र्यांना जीवनदान 

पुणे (लोकमराठी न्यूज) : डांबराच्या ड्रममध्ये फसलेल्या दोन कुत्र्यांच्या पिल्लांना पुणे अग्नीशमक दल व वाईल्ड एनिमल्स स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या अथक प्रयत्नांनंतर जीवनदान मिळाले.

सविस्तर वृत्त असे की, पुणे अग्निशमन दलातील फायरमन नुदार रवी बारटक्के यांनी वाईल्ड एनिमल्स स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटी या संस्थेला मदत मागितली. कारण, टेकडीवर त्यांचे वाहन घटनास्थळी पोहचू शकत नव्हते. घटनास्थळी असलेले चित्र मन हेलवणारे होते. डांबराने भरलेल्या ड्रममध्ये दोन छोटे कुत्र्याची पिल्ले अर्ध्या शरीराने अडकलेली होती.

खूप काळजीपूर्वक ड्रम टेकडीवरून खाली घेण्यासाठी ट्रॅक्टर बोलावण्यात आला. संदेश रसाळ आणि लक्ष्मण वाघमारे यांनी आनंत अडसूळ यांना कॉल केला आणि संस्थेचे अध्यक्ष या नात्याने ते देखील स्पॉटवर पोहोचले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आणि वाईल्ड ऍनिमल्स अँड स्नेक्स प्रोटेक्शन सोसायटीच्या सर्परक्षकांनी डांबरामध्ये अडकलेले दोन पिल्लांना खूप मेहनतीने बाहेर काढले. या रेस्क्यू मध्ये असलेल्या सर्व निःस्वार्थ सेवा करणाऱ्यांचे प्रयत्नाला यश आले.