ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक; स्वराज्य वाहन चालक संघटनेचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन

ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक; स्वराज्य वाहन चालक संघटनेचे माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन 

पिंपरी (लोकमराठी न्यूज) : सीमेवरील रक्षण करणारा सैनिक, शेतात राबून देशाची भुक भागणारा शेतकरी यांच्याप्रमाणेच देशांमध्ये ड्रायव्हर हा देशातील तिसरा महत्त्वाचा घटक मानला जातो. परंतू, आपल्या देशामध्ये डायव्हरला मानसन्मान पाहिजे, असा मिळत नाही. अशा आशयाचे निवेदन स्वराज्य वाहन चालक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने माजी आमदार हरिभाऊ राठोड यांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष गुरु कट्टी, पश्चिम महाराष्ट्र प्रमुख रवी बिराजदार, पुणे जिल्हा उपाध्यक्ष विजय काजीक, पश्चिम महाराष्ट्र प्रभारी सुभाष म्हस्के, महाराष्ट्र संपर्क प्रमुख दीपक पोपळे, कोकण विभाग अध्यक्ष अमित दुर्गाई, कोकण जिल्हा अध्यक्ष वासू वालेकर, पुणे शहर अध्यक्ष बबन धिवार, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष राहुल मदने, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष शरणू नाटेकर, पिंपरी चिंचवड सचिव गणेश गोफणे, सदस्य हनुमंत काळे, किशोर गराडे, महेश गायकवाड, युवराज मदने, पांडुरंग कांबळे, मारुती मंडले आदी उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की, ड्रायव्हर हा रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून देशातील जनतेची सेवा करत असतो. दूध, भाजीपाला, अन्नधान्य, पेपर तसेच टेम्पो ड्रायव्हर असो, कार ड्रायव्हर असो किंवा रिक्षा ड्रायव्हर किंवा अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर असो तो अहोरात्र जनतेची सेवा करत असतो. पण ड्रायव्हरला आपल्या देशात कुठल्याही प्रकारची शासकीय मदत किंवा अनुदान मिळत नाही. आता कोरोनाच्या काळात सर्व घरी असताना ड्रायव्हर हा अहोरात्र अ‍ॅम्ब्युलन्सवर ड्रायव्हिंग करत होता. आपल्या स्वतःची काळजी घेत कोरोना काळात पेशंटची सेवा करत होता. स्वतः पेशंटचे नातेवाईक लांब उभे असायचे, पण ड्रायव्हर हा त्या पेशंटला स्ट्रेचरवर घेऊन अ‍ॅम्ब्युलन्स मधून पेशंटला दवाखान्यात घेऊन जात होता. त्यामध्ये काही ड्रायव्हरांना आपला जीव गमावा लागला आहे. पण त्यांना व त्यांच्या कुटुंबाला शासनाकडून कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. शासनानेही ड्रायव्हरकडे लक्ष दिले नाही, त्यामुळे ड्रायव्हरच्या मुलांना शाळेत कॉलेजात व शासकीय क्षेत्रात सवलत मिळावी.

ड्रायव्हरांसाठी महामंडळ स्थापन करा

राज्यभरातील ड्रायव्हरांच्या सर्वांगीण विकासासाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे. ही संघटनेच्या प्रमुख मागण्यांपैकी एक मागणी असून सरकारने या मागणीची दखल न घेतल्यास मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील ड्रायव्हर आंदोलन करतील. असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.