नांदेड, ता. ०२ (लोकमराठी न्यूज) : सध्या राज्यात मनोहर भिडे सह काही वाईट प्रवृत्तीचे लोक ज्या प्रकारे द्वेषाचे वातावरण तयार करत आहेत. तसेच मणिपूरमध्ये जे वाईट घटना घडली, आत्ताही जातीय दंगली चालू आहेत. त्यामुळं मनाला खूप वाईट वाटतंय. असे मत बालाजी पवार यांनी व्यक्त केले.
पण आपलीही चूक आहे की आपण प्रेम आणि अहिंसा पसरवण्यात कुठे तरी कमी पडलो आहोत. त्यामुळे राज्यातील गांधी प्रेमींनीच्या वतीने मंगळवारी या प्रवृत्तीच्या विरोधात एक दिवसीय उपवास करून निषेध करण्यात आला. त्याप्रमाणे नांदेड येथे सुध्दा सकाळी पासून उपवास करण्यात आला. तसेच सकाळी अकरा वाजता गांधींजीच्या पुतळ्याला डॉ. जगदीश कदम सर यांचे हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. असे पवार यांनी सांगितले.
एक दिवसीय उपवासात पीपल्स काॅलेजचे माजी उपप्राचार्य बालाजी कोम्लवार, आदित्य भांगे, नजीर शेख व बालाजी पवार सहभागी झाले होते. यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. दिलीप शिंदे, सायन्स काॅलेजचे उपप्राचार्य डॉ लक्ष्मण शिंदे, सुर्यकांत वाणी, मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.