PIMPRI CHINCHWAD : माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; महिला काँग्रेसचे पोलीसांना निवेदन

PIMPRI CHINCHWAD : माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल करा; महिला काँग्रेसचे पोलीसांना निवेदन 

पिंपरी, ता. २ (Lokmarathi) : माजी मंत्री आमदारअ‍ॅड. यशोमती ठाकूर (MLA Yashomati Thakur) यांना धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात यावा. अशी मागणी पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे यांनी केली आहे.

महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या प्रदेशाध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली सायली किरण नढे यांनी आज पोलिस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे यांना निवेदन त्या अज्ञात व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

यावेळी मुख्य प्रवक्ता पिंपरी चिंचवड महिला काँग्रेस कमिटीच्या निगार बारस्कर, स्वाती शिंदे, आशा भोसले, निर्मला खैरे, भाग्यश्री थोरवे, रंजना सौदेकर, मोनिका कोहर आदी उपस्थित होत्या.

या निवेदनात म्हटले आहे की, माजी मंत्री आमदार ॲड. यशोमती ठाकूर या कायमच समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात चुकीच्या गोष्टी विरोधात नेहमीच आवाज उठवीत असतात. पण काही समाजकंटक व विघ्नसंतोषी प्रवृत्तींच्या लोकांना त्रास होतो. अशा एका कैलास सुर्यवंशी नामक समाजकंटकांने आमदार ॲड. यशोमती ठाकूर यांना ट्विटर या समाज माध्यमातून जीव मारण्याची धमकी दिली आहे. सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. अशी मागणी सायली किरण नढे यांनी केली आहे.