विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय

विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय 

हडपसर (प्रतिनिधी) : विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 ही स्पर्धा दि. 5 व 6 डिसेंबर 2022 रोजी BJS कॉलेज वाघोली येथे संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक पारितोषिके मिळवणारे महाविद्यालय म्हणून रयत शिक्षण संस्थेचे, एस. एम. जोशी महाविद्यालयाने द्वितीय क्रमांक मिळविला.

विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेमध्ये एस. एम. जोशी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सामूहिक लोकनृत्य (folk dance) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक एकांकिका (one act play) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक मूकनाट्य (Mime) कला प्रकारात प्रथम पारितोषिक, सामूहिक प्रहसन (skit) कला प्रकारात द्वितीय पारितोषिक व वैयक्तिक कात्रण (collage) कला प्रकारात द्वितीय पारितोषिक मिळविले. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारांमध्ये पारितोषिके मिळवून येथील एस. एम. जोशी महाविद्यालयाच्या शिरापेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या स्पर्धेची प्राथमिक फेरी विभागीय/जिल्हास्तरीय युवा महोत्सव स्वररंग 2022 स्पर्धेचे आयोजन ऑक्टोबर मध्ये करण्यात आले होते. एकूण साडेचारशे महाविद्यालयांनी या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता. या स्पर्धा विद्या प्रतिष्ठान महाविद्यालय (बारामती विभाग), BJS कॉलेज (नगर जिल्हा), खडकी महाविद्यालय (पुणे ग्रामीण), फर्ग्युसन कॉलेज (पुणे शहर), KTHM महाविद्यालय (नाशिक) या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या होत्या. एस. एम. जोशी महाविद्यालयाला सर्वात जास्त पारितोषिक मिळवणारे महाविद्यालय म्हणून पुणे शहर विभागामध्ये युवा महोत्सव स्वररंग स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक मिळाले होते.

विद्यापीठस्तरीय केंद्रीय युवक महोत्सव: स्वररंग 2022 स्पर्धेत एस. एम. जोशी कॉलेज द्वितीय 

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड साहेब यांनी सर्व विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रेरणा व प्रोत्साहन दिल्यामुळे विद्यार्थी हे यश मिळवू शकले. सर्व सहभागी स्पर्धक आणि विजेत्या स्पर्धकांचे महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. विद्यार्थ्यांच्या या यशात सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. अतुल चौरे, उपप्राचार्य प्रा. संजय जडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य डॉ. किशोर काकडे, डॉ.नम्रता मेस्त्री-कदम, डॉ. विश्वास देशमुख, प्रा.स्वप्निल ढोरे, डॉ. दिनकर मुरकुटे, प्रा. ऋषिकेश खोडदे या सर्वांचे योगदान आहे.