प्रबुद्ध संघातर्फे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

प्रबुद्ध संघातर्फे गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

चिंचवडगाव : प्रबुद्ध संघाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यावेळी पंचशील ध्वजारोहण व बुद्ध वंदना घेण्यात आली. तसेच गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

त्याप्रसंगी पंचशील ध्वज उत्सव कमिटीचे अध्यक्ष राष्ट्रपाल भोसले, दिलीप गोडबोले, प्रमोद साळवी, डॉ. धर्मेंद्र रामटेके, अशोक कदम, चंद्रकांत लोंढे, निशांत कांबळे, अल्पणा गोडबोले, अर्चना गवे, किशोर सोनवणे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कांबळे, दिलीप गोडबोले, सुधीर कडलग, दिंगबर घोडके यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रबुद्ध संघाचे सचिव किशन बलखंडे यांनी केले.