प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा प्रमोद गायकवाड यांच्या वतीने सन्मान

प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा प्रमोद गायकवाड यांच्या वतीने सन्मान

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

भोसरी ता. १६ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संघर्ष प्रतिष्ठान यांच्या वतीने प्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे यांचा भारदार गायनाचा कार्यक्रम भोसरी या ठिकाणी आयोजित केला होता.

या कार्यक्रमाला मिलिंद शिंदे आले असता मानव सुरक्षा सेवा संघाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रमोद गायकवाड यांच्या वतीने मिलिंद शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमाप्रसंगी संघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आयोजक संघर्ष प्रतिष्ठान भोसरी अध्यक्ष नितीलेश, बंटी, शत्रुघन डोळस, मच्छिंद्र राखपसरे तसेच संघर्ष प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी परिसरातील नागरिक आणि भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.