राष्ट्रीय भ्रष्टाचार, अत्याचार निवारण संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

राष्ट्रीय भ्रष्टाचार, अत्याचार निवारण संघटनेतर्फे विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान

बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क

भोसरी ता. 16 : भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात नॅशनल अँटी करप्शन अँड ऑपरेशन कमिटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने पत्रकार परिषद तसेच सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच संघटनेसाठी विविध उल्लेखनीय काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना वरिष्ठ पदी नियुक्ती करण्यात आल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

त्याचबरोबर कोरोना काळामध्ये ज्या डॉक्टरांनी निस्वार्थपणे सेवा दिली अशा डॉक्टरांना आणि समाजामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पत्रकारांना सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी संघटनेचे पुणे जिल्हा अध्यक्ष मनोज कुमार ईंगोलीया, श्रीमान बडे, अशोक ढोकळे, डी. एस. गरुड, किशोर देवकर, कल्याणी मेमाणे, प्रतीक ठाकूर, प्रमोद गायकवाड, संभाजी राठोड, मेहबूब शहा, आकाश पारीख, अनिल कुमार पांडे, संतोष बागडे, अमित शुक्ला, मुस्कान गुलवाणी या सर्वांनी कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले.

या कार्यक्रमाला भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, अरुण बोराडे, कविता अल्हाट, सोनम जांभुळकर, निलेश बोराटे, निखिल बोराडे, आणि संघटनेचे विविध राज्यातील पदाधिकारी, पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील, राजकीय क्षेत्रातील मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.