पिंपरीत बहुजन समाज पार्टीचे ओबीसी बचाव आंदोलन

पिंपरीत बहुजन समाज पार्टीचे ओबीसी बचाव आंदोलन

पिंपरी : राज्य शासनाच्या चुकीमुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिली. या पाश्वभुमीवर ओबीसी आरक्षण बचावासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने गुरूवारी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात बहुजन समाज पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश गायकवाड, पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, पुणे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदीप लगाडे, पिंपरी चिंचवड प्रभारी विजय मुसळे, शहराध्यक्ष सुनिल गवळी, उपशहराध्यक्ष सुधाकर फुले, कोषाध्यक्ष राहुल मदने, महासचिव राजेंद्र पवार, सचिव राजेंद्र डावरे व विक्की पासोटे, चिंचवड विधानसभा अध्यक्ष महेश कांबळे, मधुकर इंगळे, बाळासाहेब गायकवाड, दत्ता गायकवाड, अनिल ननवरे, सुभाष दळवी, सतीश काकडे, कल्याण ओव्हाळ, माऊली बोऱ्हाडे, लक्ष्मण पांचाळ, कार्यालयीन सचिव सुरज गायकवाड, श्रावण कोरी, सर्व हरा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बी. बी. शिंदे, मंगेश हिरामण धिवर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.