बौद्ध नगरमधील अभिनयकौशल्य अवतरणार रंगमंचावर
पिंपरी : बौद्ध नगर मधील जिम हॉल येथे लहान मुला मुलींबरोबरच मोठ्यांचा उत्साह पाहायला मिळाला तो म्हणजे ऑडिशन च्या निमित्ताने. आपल्या परिसरातील विद्यार्थी आणि पालकांना एकत्रित रंगमंचावर अभिनय कला सादर करता यावी, म्हणून येथील परिवर्तन युवा एकताच्या वतीने कलाकारांची निवड चाचणी घेण्यात आली. यामध्ये एकूण 51 लोकांनी सहभाग घेतला. लहान मुला मुलींचा यात जास्त सहभाग आणि उत्साह दिसून आला. शनिवारी (दि 26 मार्च) या ऑडिशन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
बौद्धनगर आणि भाटनगर मध्ये सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक आणि भौगोलिक परिवर्तन घडवून अनण्याच्या उद्देशाने, परिवर्तन युवा एकताची स्थापना झाली असून सर्वांनी राजकीय हेवे दावे बाजूला ठेऊन परिसराचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी एकत्रित काम करण्याचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी ठरवले आहे. या मध्येमातून जागतिक महिला दिनाच्या नि...