PM Narendra Modi: ‘पीएम नरेंद्र मोदी’ला स्थगिती द्या, कोर्टात याचिका

PM Narendra Modi: 'पीएम नरेंद्र मोदी'ला स्थगिती द्या, कोर्टात याचिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत ‘पीएम नरेंद्र मोदी‘ या सिनेमाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुका सुरू असल्याने या निवडणुका पारदर्शकपणे पार पडण्यासाठी या सिनेमाच्या प्रदर्शनास तुर्तास स्थगिती देण्यात यावी, असं याचिकेत म्हटलंय.

आरपीआय (आय) गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे. त्यावर मुख्य न्यायामूर्ती नरेश पाटील आणि न्यायामूर्ती नितीन जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोग, सीबीएफसी आणि चित्रपटाच्या निर्मात्याला उत्तर देण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच या प्रकरणावर सोमवारी तातडीने सुनावणी घेण्यात येणार असल्याचंही कोर्टानं म्हटलं आहे.