प्रियांका चोप्रा बॅकराऊंड डान्सरसोबत वागते वाईट, एका शोमधील स्पर्धकाने दिली धक्कादायक माहिती

प्रियांका एक अभिनेत्रीसोबतच एक खूप चांगली डान्सर देखील आहे. तिने तिच्या अनेक परफॉर्मन्समधून हे सिद्ध देखील केले आहे. पण ती बॅकराऊंड डान्सरला तुच्छ मानते असे एका व्यक्तीने नुकतेच एका रिअ‍ॅलिटी शोच्या दरम्यान म्हटले आहे.

प्रियांका चोप्रा बॅकराऊंड डान्सरसोबत वागते वाईट, एका शोमधील स्पर्धकाने दिली धक्कादायक माहिती

प्रियांका चोप्राने आज तिच्या अभिनयाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये देखील तिचे एक प्रस्थ निर्माण केले आहे. मिस वर्ल्ड हा किताब मिळाल्यानंतर प्रियांकाने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तिने आजवर ऐतराज, बर्फी, मुझसे शादी करोगी, बाजीराव मस्तानी यांसारख्या अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. तिला तिच्या अभिनयासाठी आजवर अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. प्रियांकाने काहीच महिन्यांपूर्वी तिचा प्रियकर निक जोनाससोबत लग्न केले.