कवी किशोर कदम यांना ‘दु:खी’ पुरस्कार

कवी किशोर कदम यांना ‘दु:खी’ पुरस्कार

राज्यपातळीवरील विसावा राय हरिश्चंद्र साहनी ऊर्फ ‘दु:खी’ काव्य पुरस्कार या वर्षी किशोर कदम (सौमित्र) यांना कवितेतील योगदानाबद्दल जाहीर झाला आहे. येत्या ६ एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर नाटय़गृहात कादंबरीकार रंगनाथ पाठारे यांच्या हस्ते हा पुरस्कार ‘कवितेचा पाडवा’ कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे. स्व. नंदकिशोर साहनी चॅरिटेबल ट्रस्ट आणि अनुभव प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे निमंत्रक अभय साहनी, विनीत साहनी आणि कवयित्री संजीवनी तडेगावकर आहेत. या निमित्ताने आयोजित कविसंमेलनात विजय चोरमारे, सुमती लांडे, शोभा रोकडे, बालाजी सुतार, भरत दौंडकर, आबा पाटील, समाधान इंगळे सहभागी होणार आहेत. संजीवनी डहाळे यांचे चित्रप्रदर्शन आणि विलास भुतेकर, कालिदास वेदपाठक, ज्ञानेश्वर गिराम यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे.