
बाळासाहेब मुळे : लोकमराठी न्यूज नेटवर्क
चिंचवड, ता ७ : पिंपरी-चिंचवड शहर हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. या शहरांमध्ये प्रथमच नऊवारी साड्या घालून भव्य फॅशन शोचे आयोजन येथे करण्यात आले आहे. येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन विविध राजकीय मान्यवर व सिने कलाकार यांच्या उपस्थितीत शनिवारी (ता. ९ जुलै) सकाळी अकरा वाजता होणार असून हा कार्यक्रम सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहील. तरी शहरातील सर्व रसिक प्रेक्षकांनी या भव्यदिव्य कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे कार्यक्रमाचे आयोजक चैताली भोईर यांनी आवाहन केले आहे.
यामध्ये महाराष्ट्रीय संस्कृतीला साजेसा असा नऊवारी साज व त्यासोबत पुरूष आयकॉन (ट्रॅडिशनल कपडे) या स्पर्धेत लहान मुलं-मुली देखील सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील नऊवारी साड्यांसाठी प्रसिद्ध असलेले नऊवारी नार वस्त्र दालन यांच्यातर्फे चैताली नकुल भोईर यांनी केले आहे. या सर्व स्पर्धा चार गटांमध्ये होत असून मिस, मिसेस, मिस्टर, किड्स या गटात स्पर्धेमध्ये 100 हून स्पर्धेक पिंपरी-चिंचवड शहरातून सहभागी झालेले आहे.
या स्पर्धेमध्ये विजेत्या होणारया स्पर्धकांना सोन्याची नथ व सोन्याचे ब्रेसलेट पैठणी साड्या, क्राऊन, ट्रॉफी विविध आकर्षक बक्षिसे तसेच प्रेक्षक म्हणून सहभागी होणाऱ्या सर्व महिलांना एक ग्रॅम सोन्याची नथ व विविध गिफ्ट हॅम्पर बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत. तसेच या स्पर्धेचे मुख्य आकर्षण महाराष्ट्रातील आंतरराष्ट्रीय लावणी सम्राट किरण कोरे यांच्या लावण्यांचा बहारदार कार्यक्रमाची मेजवानी आहे.
सदर कार्यक्रमाला सहसंयोजक शंभो सिल्क, अँड साडी, कृष्णाई पल्स शॉपी, क्लिओपात्रा ब्युटी इन्स्टिट्यूट, डिवाइन क्रिएशन, साई श्रद्धा लेडीज शॉपी यांचा सहभाग आहे.
- पिंपरी चिंचवड युवक काँग्रेस आयोजित गौरी गणपती सजावट स्पर्धेत वर्षा कदम प्रथम
- Pimple Gurav : अनंतनगर तरुण मित्र मंडळाच्या गणेश मुर्तीची प्रतिष्ठापना
- PM VISHWAKARMA YOJANA : एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज कसे मिळवायचे? जाणून घ्या
- Horoscope Today 11 September 2023 : आजचे राशी भविष्य, या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती उत्तम
- PCMC: जयश्री राऊत ठरल्या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘आदर्श शिक्षिका’