डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : डॉ. सागर वागज (Dr Sagar Wagaj) यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा स्मिता पवार यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप पिंपरी चिंचवड प्रवक्ते प्रकाश हगवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

वागज होमिओपॅथी हॉस्पिटलच्या (Wagaj Homeopathic Hospital) माध्यमातून गेली १६ वर्षापासून पूर्णानगर, शाहूनगर व संभाजीनगर या भागामधील नागरिकांना ते सेवा देत आहेत.

डॉ. सागर वागज म्हणाले की, “(Aam Aadmi Party) आम आदमी पार्टीचे दिल्ली (Delhi) आणि पंजाब (Panjab) येथील काम पाहून मी प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आज केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार State Government) यांनी प्रचंड महागाई वाढवून ठेवली आहे. सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे मुश्किल झाले आहे. प्रचंड मोठ्या प्रमाणावर ती भ्रष्टाचार सर्वत्र देशभर चालू आहे. भ्रष्टाचार मुक्त आणि स्वच्छ प्रतिमेचा पक्ष आम आदमी पार्टी आहे. म्हणून मी या पक्षामध्ये प्रवेश केला. यापुढे पक्ष वाढीसाठी मी सातत्याने प्रयत्न करणार आहे.” असे त्यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.