Tag: Aap

मनपा क्रीडा धोरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विविध सकारात्मक धोरणात्मक मागण्या
पिंपरी चिंचवड

मनपा क्रीडा धोरणासंदर्भात आम आदमी पार्टीने विविध सकारात्मक धोरणात्मक मागण्या

मनपाच्या क्रीडा धोरणात ऑलिम्पिक विचारांचा दृष्टिकोन ठेवा पिंपरी चिंचवड : आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवडच्या वतीने आज आयुक्त शेखर सिंह यांना व्यापक मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या बद्दल आम आदमी पार्टीच्या क्रीडा विभागाचे अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहरातून ऑलिम्पिक दर्जाचे खेळाडू तयार होण्यासाठी महाराष्ट्र राज्यसरकारच्या २००१ च्या क्रीडा धोरणातील विविध शिफारशीचा अवलंब मनपा प्रशासनाने केलेला नाही.पायाभूत सुविधासह भारतीय मैदानी व ऑलिम्पिक दर्जाच्या खेळासाठी शहरातील खाजगी व सरकारी शाळांमधील विद्यार्थी व शिक्षकांना प्रोत्साहन देणारे मनपाचे क्रीडा धोरण असले पाहिजे,त्यासाठी आम्ही खालील मागण्या आयुक्त साहेबांना केलेल्या आहेत असे आप क्रिडा आघाडी अध्यक्ष राहुल धोत्रे यांनी सांगितले. 'आप'च्या व्हिजन डाक्युमेंट मध्ये आमचे क्रीडा धोरण स्पष्ट करत आहोत असे शहर कार्...
डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

डॉ. सागर वागज यांचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : डॉ. सागर वागज (Dr Sagar Wagaj) यांनी आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला. पिंपरी चिंचवड शहर महिला अध्यक्षा स्मिता पवार यांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला. यावेळी डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, पुणे जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, पिंपरी चिंचवड आम आदमी पार्टी संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, आप पिंपरी चिंचवड प्रवक्ते प्रकाश हगवणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. वागज होमिओपॅथी हॉस्पिटलच्या (Wagaj Homeopathic Hospital) माध्यमातून गेली १६ वर्षापासून पूर्णानगर, शाहूनगर व संभाजीनगर या भागामधील नागरिकांना ते सेवा देत आहेत. डॉ. सागर वागज म्हणाले की, "(Aam Aadmi Party) आम आदमी पार्टीचे दिल्ली (Delhi) आणि पंजाब (Panjab) येथील काम पाहून मी प्रेरित होऊन आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. आज केंद्र सरकार (Central Government) व राज्य सरकार State...
एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज
राजकारण, मोठी बातमी

एका स्वप्नभंगाचा वाढदिवस आणि महाराष्ट्राला तिसऱ्या पर्यायाची गरज

हेरंब कुलकर्णी आज मनसेचा वर्धापन दिन साजरा होतो आहे. मनसे ज्या दिवशी स्थापन झाली, तो दिवस अजूनही आठवतो आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि शहरी तरुणांना एक स्वप्न राज ठाकरेंनी दाखवले. खेड्यापाड्यातून शिवाजी पार्कला गाड्या भरून गेल्या होत्या आणि डोळ्यात लकाकी घेऊन खेड्यापाड्यातली मुले गावाकडे आली होती. १३ आमदार निवडून आल्यावर त्या स्वप्नाला धुमारे फुटले आणि पुढे व्हाया मोदी, व्हाया पवार, व्हाया फडणवीस असा आजपर्यंतचा प्रवास समोर आहे. असेच स्वप्न राष्ट्रवादी काँग्रेसने दाखवले होते. अशाच खेड्यापाड्यातून तरुणांच्या गाड्या भरून गेल्या होत्या. काँग्रेसमधून ते बाहेर आले याचा अर्थ कॉंग्रेसची सरंजामदारी संस्कृती दूर करतील आणि नवी राजकीय संस्कृती देतील असे वाटले होते पण सारे सहकार सम्राट शिक्षण सम्राट घराणेशाही सम्राट त्यांच्यामागे आले आणि काँग्रेसची भ्रष्ट आवृत्तीच हा पक्ष म्हणून समोर आला. ...
PCMC : आम आदमी पक्षाने कष्टकरी महिलांच्या हस्ते केले ध्वजारोहण
पिंपरी चिंचवड

PCMC : आम आदमी पक्षाने कष्टकरी महिलांच्या हस्ते केले ध्वजारोहण

आकुर्डी : प्रजासत्ताक दिनानिमित्त आम आदमी पक्षाच्या वतीने आकुर्डी येथे चेतन बेंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते, यामध्ये स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यावेळी पक्षाच्या मागील वर्षातल्या विविध उपक्रमांमध्ये हिरिरीने भाग घेणाऱ्या कष्टकरी महिलांचे योगदान व कार्य लक्षात घेता त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहण व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करत विविध सामाजिक उपक्रमात आपले योगदान देणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा तसेच स्थानिक नागरिकांचा सत्कार करण्यात आला. या वैशिष्ट्यपूर्ण संकल्पनेबद्दल उपस्थित नागरिकांनी आनंद व्यक्त केला. खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक दिनाचे वेगळेपण यात दिसून आल्याबद्दल समाधान व्यक्त केले. ध्वजारोहणाचा कार्यक्रम इंदुमती पुन्नासे, माधुरी अरणकल्ले व संगीता थोरवे यांच्या हस्ते संपन्न झाला. ...