उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलाकारांचा सन्मान

उन्नती सोशल फाऊंडेशनतर्फे जागतिक रंगभूमी दिनानिमित्त कलाकारांचा सन्मान

पिंपरी (प्रतिनिधी) : कला क्षेत्रातील विविध अभिनय साकारणाऱ्या पिंपरी-चिंचवडमधील अभिनेता व अभिनेत्रींच्या कार्याची दखल घेण्यात आली आहे. जागतिक रंगभूमी दिनानिमित्त उन्नति सोशल फाऊंडेशनच्या वतीने प्रसिध्द सिने कलाकार उमेश धूत, ईशान गोडसे व सौ वसुधा गोडसे यांचा सन्मान करण्यात आला.

उमेश धूत यांनी दिक्षीत, सावट, मुळशी पॅटर्न, देवा, सुर सपाटा इत्यादी मराठी तर ये है मोहब्बते, तेरा क्या होगा कालिया, लक्ष अशा हिंदी चित्रपटांसह प्रेमा तुझा रंग कसा, सुर राहू दे आदी मराठी सिरियल्समध्ये भूमीका साकारली आहे. तसेच, त्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रसिध्द केलेल्या जाहिरातींमध्येही त्यांनी काम केले आहे. व ईशान गोडसे यांनी ही सोयरीक या मराठी चित्रपट बरोबरच कॅडबरी चॉकलेट व इतर जाहिरातींमध्ये काम केले आहे. तर वसुधा गोडसे या बऱ्याच चित्रपटा मध्ये काम करत बरोबरच उत्तम कार्यक्रम संचालिका आहेत.

प्रत्येक कलाकार हा कला जगत असतो. अभिनयाच्या जोरावर सत्य प्रकट करण्याचा तो अटोकाट प्रयत्न करत असतो. आपल्या कलेचा अविष्कार दाखवून लोकांच्या मनावर अधिराज्य करणारा कलाकार असतो. त्याच्या कलेची दखल समाजातील प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे. कला क्षेत्राला उभारी देण्यासाठी आपण कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे मत उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा तथा भाजपा महिला मोर्चा चिंचवड विधानसभेच्या अध्यक्षा कुंदा भिसे यांनी व्यक्त केले.

उमेश धूत म्हणाले कि, आज जागतिक रंगभूमी दिन हा दिन आमच्यासाठी खूप आनंदाचा दिन असतो व या दिवशी फाउंडेशन चा अध्यक्ष सौ कुंदाताई संजय भिसे यांनी आमचा सन्मान करून आम्हाला इथे बोलवलं त्याबद्दल त्यांचे खूप आभार व कुंदाताई जशा नेहमी समाजकार्य करतात तसेच इथून पुढेही करत राहतील हि अपेक्षा करतो.

वसुधा गोडसे म्हणाल्या कि, आम्ही गेली 5 वर्षे झाले पाहतोय कुंदाताई समाजकार्यासोबतच महिलांसाठी जास्त कार्यरत असतात व त्या इथून पुढेही असे कार्य करत राहतील व आम्ही महिला त्यांना खूप आशेने पाहत असतो कारण त्यांनी आज पर्यंत महिलांसाठी खूप कार्य केले आहेत व त्यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा व आम्हाला या ठिकाणी बोलवल्याबद्दल त्यांचे आभार.

त्यावेळी शाम कुंजीर म्हणले कि, पिंपरी चिंचवड मध्ये मी पहिल्यांदाच अश्या उन्नति सोशल फाउंडेशन च्या अध्यक्षा सौ कुंदाताई संजय भिसे यांची काम करण्याची पद्धत पहिली म्हणजेच समाजकार्य करत असताना देखील बरेच लोक आधी सांगतात कि मी हे काम करणार आहे मग ते काम करतात परंतु कुंदाताई आधी समाजासाठी काम करतात मग ते लोकांना कळत म्हणजे सांगायचं उद्धेश एकच कि याना समाजकार्य खूप महत्वाचं आहे व कुंदाताई ना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

त्यावेळी रमेश वाणी, डॉ. सुभाषचंद्र पवार व विठाई मोफत वाचनालयाचे सभासद व इतर नागरिक उपस्थित होते.