ताज्या घडामोडी

ताज्या घडामोडी

मार्केटिंग फंडा

पिंपरी (लोकमराठी ) : महिलांनो, नवरात्रीतले नऊ रंग धार्मिक नाहीत, हा तर होता मार्केटिंग करण्याचा फंडा!! तुम्हाला कधी प्रश्न पडलाय, की कोण ठरवतं हे रंग म्हणून? किंवा याच दिवशी हाच रंग घालायचा ही परंपरा कितीशे वर्षांपासून चालत आली आहे म्हणून? हो, आम्हाला पडला हा प्रश्न आणि आम्ही त्याचं उत्तरही शोधून काढलं. गंमत म्हणजे आमच्या उत्तराला क्विंटचं अनुमोदनही मिळालं.उत्तर आणि त्यामागची कथा मोठी रंजक आहे हो. वाचाच मग आता.. तर, आठवणीप्रमाणे साधारण २००३च्या सुमारास आपल्या महाराष्ट्र टाईम्सने श्रावणक्वीन आणि नवरात्रीचे नऊ रंग हा प्रकार चालू केला. पहिले दोन-तीन दिवस मटा पुरवणीमध्ये त्या दिवसाच्या रंगाच्या सुंदरशा साडीमधल्या मॉडेलचे फोटो हे आकर्षण होतं. मग आलं तुमचेही असे ऑफिसमध्ये सगळ्यांनी एकाच रंगाचे कपडे घातल्याचे फोटो पाठवा म्हणून आवाहन. मग काय, बँका, शाळा , ऑफिसेस मधल्या ग्रुप फोटोजनी मटा पुरवणी...
कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन
ताज्या घडामोडी, मनोरंजन

कादंबरीकार ज्येष्ठ साहित्यिक किरण नगरकर यांचं निधन

मुंबई (लोकमराठी) - ज्येष्ठ साहित्यिक, कादंबरीकार आणि नाटककार किरण नगरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 77 व्या वर्षी मुंबईतील बॉम्बे रग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नगरकर यांचं मराठी आणि इंग्रजीमध्ये मोठं लेखन आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता त्यांच्या पार्थिव शरीरावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. सात सक्कम त्रेचाळीसह या कांदबरीसह त्यांच्या अनेक नामवंत साहित्याच साहित्य क्षेत्रासाठी मोठं योगदान आहे. सन 2001 मध्ये इंग्रजी साहित्य अकादमीचा पुरस्कारही नगरकर यांना मिळाला होता. किरण यांच्या निधनामुळे मराठी साहित्य क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया पत्रकार अस्मिता मोहिते यांनी दिली आहे. दरम्यान, मेंदूत रक्तश्राव झाल्यामुळे त्यांना बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, गुरुवारी रात्री बॉम्बे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ...
उकडीचे मोदक – गणेश चतुर्थी स्पेशल
ताज्या घडामोडी

उकडीचे मोदक – गणेश चतुर्थी स्पेशल

गणेश चतुर्थीसाठी बाजारात अनेक प्रकारचे मोदक उपलब्ध असले तरी खरा मान असतो तो उकडीच्या मोदकालाच. कोकणाची खासियत असलेले उकडीचे मोदक आता महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि जगभरातही लोकप्रिय होत आहेत. खरे तर यात तीनच मुख्य घटक लागतात - तांदळाची पिठी, नारळ आणि गूळ. आणि तूप वापरले नाही तर वेगन डाएट करणाऱ्यांनाही सहज खाता येतील. तर आज करून पाहूया authentic उकडीचे मोदक. खाली विशेष टिप्स दिल्या आहेत ज्यामुळे मोदक बनवणे सोपे जाईल. साहित्य : सारणासाठी १ मोठा नारळ, खवणून शक्यतो पांढराशुभ्र भाग घ्यावा. १ मोठी वाटी गूळ, किसून अर्धा चमचा वेलचीपूड कव्हरसाठी १ ग्लास मोदकाचे पीठ (हे बाजारात सहज मिळते पण घरीही बनवू शकतो, कृती खाली वेगळी दिली आहे.) २ चमचे साजूक तूप १ ग्लास पाणी कुकिंग टिप्स : कोकणात बरेचदा गोड पदार्थात मीठ घातले जाते. हवे असल्य...
जि.प.शाळा पथराड घडवतेय गुणवान विद्यार्थी
ताज्या घडामोडी

जि.प.शाळा पथराड घडवतेय गुणवान विद्यार्थी

जि.प.शाळा पथराड घडवतेय गुणवान विद्यार्थी जि.प.शाळा पथराड लोकसहभाग - लोकसहभागातून शाळेसाठी प्रोजेक्टर खरेदी केला. विद्यार्थीनी - ४५ विद्यार्थी - ५१ एकूण - ९६ कजगाव ता. भडगाव जि. जळगाव येथून जवळच असलेल्या जि.प.शाळा पथराड शाळेत आज रोजी सर्व विद्यार्थी डिजिटल शिक्षण घेत आहेत, विद्यार्थी व शिक्षक यांच्या समन्वयाने आज या शाळेतील विद्यार्थी आधुनिक जगाशी जोडले गेले आहेत, नवनवीन माहिती शिकू लागली आहेत.तसेच शिक्षकांच्या मदतीने डिजिटल साहित्य स्वतः वापरू लागली आहेत आणि शाळा प्रगत महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेन गतीने वाटचाल करत आहे. जि.प.शाळा पथराड विशेष म्हणजे ४ वर्षापूर्वी या शाळेची सर्वच क्षेत्रात हलाखीची स्थिती होती.त्यावेळेस शाळेत नव्याने आलेले शिक्षक नंदू पाटील यांनी ग्रामस्थ व पालक यांच्यात शाळा डिजिटल करण्याविषयी बैठका घेऊन शाळेसाठी २५ हजार रुपये लोकवर्गणी जमा करून प्रोजे...
वारक-यांचे हिंदुत्वच देशाला तारणार : रामदास फुटाणे
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

वारक-यांचे हिंदुत्वच देशाला तारणार : रामदास फुटाणे

Lok Marathi News Network पिंपरी चिंचवड : कान्होपात्राला क्लिओपात्रा करण्याचे स्वप्न दाखविणा-या मोजक्या भांडवलदारांच्या हातात देशाची अर्थव्यवस्था केंद्रीत होत आहे. देशामध्ये व्यक्ति, पक्ष महत्वाचा नसून देशातील 90 टक्के संपत्ती 10 टक्के भांडवलदारांच्या हातात जात आहे. याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. देशाला सनातनी, धार्मिक व सांस्कृतिक दहशतवादापासून वारक-यांचे हिंदुत्वच देशाला तारणार आहे, असे प्रतिपादन रामदास फुटाणे यांनी चिंचवड येथे केले. ज्येष्ठ नगरसेवक व पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या निवासस्थानी शुक्रवारी (26 एप्रिल) ज्येष्ठ साहित्यिक, माजी आमदार रामदास फुटाणे यांच्या उपस्थितीत शहरातील साहित्य, कला, नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. या वेळी माजी मंत्री गुलाबराव देवकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघे...
प्राधिकरणाकडे ‘रिंगरोड’च्या जागेचा ताबा नसताना बेकायदेशीर अतिक्रिमण कारवाई
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

प्राधिकरणाकडे ‘रिंगरोड’च्या जागेचा ताबा नसताना बेकायदेशीर अतिक्रिमण कारवाई

पिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची रहाटणी येथील नियोजित एचसीएमटीआर (रिंगरोड) प्रकल्पाची जागा अद्याप जिल्हाधिकार्‍यांमार्फत ताब्यात आलेली नसताना त्या जागेवर प्राधिकरणाने अतिक्रमण कारवाई केली आहे. ही बाब उच्च न्यायालयाच्या व महापालिकेच्या सुनावणी दरम्यान उघड झाली आहे. प्राधिकरण व महानगरपालिकेच्या या अन्यायकारक कारवाई विरोधात स्वाभिमानी घरबचाव संघर्ष चळवळीने लढा उभारला आहे, अशी माहिती स्वाभिमानी घरबचाव संघर्ष चळवळीचे मुख्य समन्वयक धनाजी येळकर पाटील यांनी पिंपरीत गुरुवारी (25 एप्रिल 2019) आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या वेळी गौरव धनवे, हेमलता लांडे, विजय लोट, खंडेराव जमादार, सतीश काळे,सविता लोयरे, बालाजी ढगे आदी उपस्थित होते. लॅण्ड ऍक्वीजीशन कायद्यान्वये कलम 11 नुसार प्राधिकरणाने 5 वर्षाच्या आत नोटीस काढणे क्रमप्राप्त होते. परंतु...
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड, राजकारण

सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप-सेना युतीला पराभूत करा : लोकशाही बचाव समिती

पिंपरी चिंचवड : 2014च्या निवडणुकीमध्ये भाजप सेना युतीने आपल्या जाहिरनाम्यात दिलेल्या आश्वासनांपैकी एकही आश्वासन मोदी सरकार पूर्ण करू शकले नाही. सुरु असणा-या लोकसभा निवडणुकीत या विषयी एकही शब्द न काढता विनाकारण नको ते मुद्दे उपस्थित करून सर्वसामान्य मतदारांची दिशाभूल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत. 2014मध्ये त्यांनी दिलेल्या जाहिरनाम्यावर विश्वास ठेवून देशभरातील जनतेने त्यांना एकहाती सत्ता दिली होती. मात्र आता जनतेचा त्यांच्यावरील विश्वासच उडाला आहे. असा सर्वसामान्यांचा विश्वासघात करणा-या भाजप सेना युतीला सुज्ञ मतदारांनी पराभूत करावे, असे आवाहन लोकशाही बचाव समितीचे समन्वयक मानव कांबळे यांनी पिंपरी येथे केले. लोकशाही बचाव समितीच्या वतीने पिंपरीमध्ये शनिवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत यावेळी माजी नगर...
प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स तर्फे सामाजिक उपक्रम
ताज्या घडामोडी, पुणे, सामाजिक

प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स तर्फे सामाजिक उपक्रम

पुणे : प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन व हैदराबाद सेल्सफोर्स स्वयंसेवकांनी सीएसआर अंतर्गत बाल शिक्षण विषयावर कार्यशाळा व शालेय साहित्य वाटप हा उपक्रम मावळ तालुक्‍यातील शिक्षणग्राम व आभाळमाया वसतिगृहात राबविण्यात आला. समाजात अनेक व्यक्ती दैनंदिन वस्तूंसाठी वंचित असतात. त्यांच्या जीवनात देखील आनंदाचे काही क्षण यावे म्हणून सेल्सफोर्स कंपनीच्या सुमारे 28 स्वयंसेवकांनी प्रयत्न सोशल ऑर्गनायझेशन सोबत संयुक्तपणे सीएसआर अंतर्गत वेगवेगळे उपक्रम राबविले. मळवली येथील शिक्षणग्राम वसतिगृहातील 175 मुलांना संपूर्ण शालेय साहित्य वाटप, टोपी व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच यावेळी बाल शोषण विषयावर कार्यशाळाही घेण्यात आली. त्यामध्ये मुलांना बाल शोषणापासून कशाप्रकारे बचाव करावा, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. मावळ तालुक्‍यातील पाचाने येथे आभाळमाया आश्रयस्थानातील 25 मुलींना संपूर्ण शालेय व सं...
बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी
ताज्या घडामोडी, पिंपरी चिंचवड

बोगस प्रमाणपत्र प्रकरणातील महापालिकेच्या 28 लिपिकांची खातेनिहाय चाैकशी

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे. त्यामुळे 117 कर्मचा-यांपैकी 28 लिपिकांची पदोन्नती रद्द करण्यात आली. त्या कर्मचा-यांचे वर्ग ड चतुर्थश्रेणी पदावर पदावतन करुन खातेनिहाय चाैकशीचे आदेश आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी दिले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली. महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने काही दिवसापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. ...
राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी
ताज्या घडामोडी, महाराष्ट्र

राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी

राजीव परीख क्रेडाई-महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी पुणे : क्रेडाई- महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी कोल्हापूरचे राजीव परीख यांची बिनविरोध निवड करण्यात आली. क्रेडाई – महाराष्ट्रची निवडणूक आज पुण्यातील कॉनरॅड हॉटेल येथे झाली. क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसभासदांनी एकमताने राजीव परीख यांची २ वर्षाच्या कालावधीसाठी निवड केली.येत्या १ एप्रिल पासून ते पदभार स्वीकारतील. यावेळी क्रेडाई नॅशनलचे चेअरमन गीतांबर आनंद, क्रेडाई नॅशनलचे प्रेसिडेंट इलेक्ट सतीश मगर,क्रेडाई नॅशनलचे अध्यक्ष जक्षय शहा, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया तसेच ५१ शहरातील अनेक सदस्य उपस्थित होते. २०१९ -२१ या कालावधीसाठी क्रेडाई- महाराष्ट्रच्या उपाध्यक्ष पदांच्याही निवडणुका सदरदिवशी झाल्या त्यात संघटनेची नवी राज्य कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्यात सुनील फुरडे (सोलापूर), महेश साधवानी (नागपूर),रसिक चौव्हाण (नवी मु...