तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर
खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार सुनील शेळके यांच्या सामुहीक प्रयत्नांना यश
पुणे (लोकमराठी न्यूज नेटवर्क) : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार सुनील शेळके यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने या ५४ कि. मी. लांबीच्या रस्त्यासाठी १०१५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. त्याचबरोबर शिरूर तालुक्यातील न्हावरा ते चौफुला रस्त्यासाठीही २२० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर आधी पायाभूत सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे खासदार झाल्यानंतर डॉ. कोल्हे यांनी रस्ते विकासाच्या प्रलंबित कामांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यानुसार तळेगाव - चाकण - शिक्रापूर रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामासाठी खासदार डॉ. कोल्हे व आमदार सुनील ...









