संविधान दिनानिमित्त शनिवारी पुण्यात संविधान जागर कीर्तन

संविधान दिनानिमित्त शनिवारी पुण्यात संविधान जागर कीर्तन

पुणे, (लोकमराठी) : संविधान दिनानिमित्त लोकायत आणि जनता दल (सेक्युलर) यांच्या वतीने कीर्तनकार, ज्येष्ठ पत्रकार व प्रसिद्ध कवी शामसुंदर सोन्नर महाराज यांचे संविधान जागर कीर्तन (संत साहित्यातील संविधान मूल्ये) आयोजित केले आहे. पुणे-नवी पेठ येथील पत्रकार भवनात शनिवारी (दि. २३) संध्याकाळी ६ वाजता हे कीर्तन होणार असून प्रवेश विनामूल्य आहे.

समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूता ही मूल्य भारतीय संविधानाचा मूळ गाभा आहे. संविधानाची हीच मूल्ये आपल्याला वारकरी संत साहित्यात जागोजागी पाहायला मिळतात. इतर संत वचनांतूनही सामाजिक समतेचा विचार आलेला आहे. जात, पात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणूस म्हणून जगण्याचा संदेश वारकरी संतांच्या साहित्यातून मिळतो.

वारकरी संप्रदाय हा स्वातंत्र्य-समता-बंधुता यांचा आग्रह धरणारा पुरोगामी विचार आहे. वारकरी संतांच्या समतेच्या विचारांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटले आहे.

भारतीय संविधानाबद्दल देशात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. संविधानाबद्दल लोकांमध्ये खूपच कमी माहिती आहे.

संविधानाबद्दल जनसामान्यांमध्ये जागृती व्हावी म्हणून जेष्ठ पत्रकार, संवेदनशील कवी शामसुंदर सोन्नर महाराज यांचे ‘जागर संविधानाचा’ हे कीर्तन लोकायतने संविधान दिनाच्या निमित्ताने आयोजित केले आहे. त्यामुळे या कीर्तनाला उपस्थित राहण्याचे आवाहन लोकायतच्या तर्फे करण्यात आले आहे.

संपर्क :

  • ऋषिकेश: 9423507864
  • शकुंतला: 9850254679