Tag: Pune

पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी नचिकेत बालग्राम अनाथ आश्रमात
पिंपरी चिंचवड

पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांची दिवाळी नचिकेत बालग्राम अनाथ आश्रमात

पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांनी नचिकेत बालग्राम अनाथआश्रमात साजरी केली दिवाळी पिंपरी (लोकमराठी) : पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड रिसर्चच्या आर्ट सर्कल विभागातील विद्यार्थ्यांनी यावर्षी दिवाळी ‘नचिकेत बालग्राम’ या अनाथ आश्रमात साजरी केली. आर्ट सर्कलच्या विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त फराळ, स्वत: रंगविलेल्या पणत्या, आकाश कंदिल नचिकेत बालग्राममधील विद्यार्थ्यांना भेट दिल्या. तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूदेखील देण्यात आल्या. यावेळी पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. एच.यू. तिवारी, आर्ट सर्कलच्या समन्वयक प्राध्यापिका प्रिया ओघे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या संयोजनात वैष्णवी पाटील, चिन्मय जगताप, रोहित दिवेकर, आयुष केदारी, तमन्ना विश्नोई, नेहूल गुप्ता, ज्ञानदा, जुई पाणगरे, झैद रिजवान पिंजारी, स्वराज पवार आदींनी सहभाग घेतला. पीसीईटी...
‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट; ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ चित्रपटांची मेजवानी
मनोरंजन

‘इफ्फी’च्या इंडियन पॅनोरमात ६ मराठी चित्रपट; ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ चित्रपटांची मेजवानी

नवी दिल्ली (लोकमराठी) : गोव्यात आयोजित होणाऱ्या ‘50 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या’ (इफ्फी) इंडियन पॅनोरमामध्ये यावर्षीचे 41 सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपट प्रदर्शित होणार असून यात 6 मराठी चित्रपटांनी स्थान मिळविले आहे. इफ्फीचे हे 50 वे वर्ष असून 20 ते 28 नोव्हेंबर 2019 दरम्यान, या प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. 76 देशांचे एकूण 200 चित्रपट या महोत्सवात प्रदर्शित होणार असून इंडियन पॅनोरमा या मानाच्या विभागात 5 फिचर आणि 1 नॉन फिचर असे एकूण 6 मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. इंडियन पॅनोरमात भारतीय भाषांतील 26 फिचर आणि 15 नॉन फिचर असे एकूण 41 चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. यावर्षी सर्वोत्कृष्ट ठरलेल्या भारतीय चित्रपटांची या विभागात निवड करण्यात आली आहे. ‘आनंदी गोपाळ’, ‘भोंगा’ अशा दर्जेदार मराठी चित्रपटांची मेजवानी फिचर चित्रप...
कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना
पिंपरी चिंचवड, मोठी बातमी

कचरा प्रश्नी, आता थेट आयुक्तांच्या बंगल्यावरच डस्टबिन आंदोलन – अपना वतन संघटना

Lok Marathi News Network पिंपरी चिंचवड : शहरामध्ये मागील अनेक महिन्यांपासून ठिकठिकाणी कचरा साचलेला दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते तसेच नगरसेवकांनी स्वतः वारंवार मागणी करूनही कचरा प्रश्न मार्गी लावण्यात महापालिकेला अपयश आले आहे. काहीही असले तरी आरोग्यप्रमुख व आयुक्त श्रावण हर्डीकर हेच या समस्येला जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी येत्या शनिवारपर्यंत (दि. १३) तातडीने तोडगा काढावा. अन्यथा अपना वतन संघटनेच्या वतीने रविवार (दि. १४) सकाळी १० वाजता आयुक्त हर्डीकर यांच्या बंगल्यावर डस्टबिन आंदोलन करण्यात येईल. असा इशारा अपना वतनचे अध्यक्ष सिद्दीक शेख यांनी दिला आहे. १ जुलै पासून आरोग्य विभागाने कचरा संकलन व वाहनाचे काम बीव्हीजी इंडिया व ए. जी इन्व्हायरो इन्फ्रा प्रोजेक्ट्स या कंपन्यांना दिले आहे. त्यापोटी त्यांना लाखो रुपये देण्यात येणार आहेत. परंतु आठवडा उलटून गेला तरी या दोन्ही कंपन्यांन...