धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड

तळेगाव, दि.१ (लोकमराठी) – धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी निखारे साहेब यांनी ही निवड केली.

नवनिर्वाचित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
चेअरमन पदी विनोद टकले, सचिव पदी संजय शिंदे, खजिनदार पदी सुधीर खांबेटे

या प्रसंगी धर्मवीर नागरी सहकारी पतसंस्थेच्या २०२४ कॅलेंडरचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या मावळ तालुका अध्यक्ष सायली बोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सायली बोत्रे यांची भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड

संस्थेचे संस्थापक खंडू टकले यांनी सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी व संचालकांचे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी सर्व आजी माजी संचालक ,पतसंस्थेचे कर्मचारी, दैनंदिन प्रतिनिधी उपस्थित होते.

धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्था तळेगाव दाभाडेच्या उपाध्यक्ष पदी जितेंद्र बोत्रे यांची बिनविरोध निवड