PCMC : राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

PCMC : राष्ट्रवादी युवकच्या शिष्टमंडळाने घेतली आयुक्तांची भेट; शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

पिंपरी, ता. ४ : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील प्रलंबित प्रश्नांबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे स्विय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांच्या प्रमुख उपस्थितीत महापालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांची भेट घेतली आणि शहरातील विविध प्रभागातील प्रलंबित कामे आणि समस्या सोडविण्याबाबत चर्चा केली.

शहराच्या विविध प्रभागातील विकास कामे आणि प्रलंबित प्रश्न तसेच प्रभागातील इतर समस्या युवक पदाधिकाऱ्यांनी आयुक्तासमोर मांडल्या. विशाल वाकडकर यांनी त्यांच्या वाकड, ताथवडे पूनावळे भागातील दिवसेंदिवस होत असलेली वाहतुकीची गंभीर समस्या त्याचबरोबर खड्डेमय रस्ते, मुंबई बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात वारंवार साचनारे पाणी याबाबत सविस्तर विचारणा केली.

विशाल काळभोर यांनी त्यांच्या चिंचवड प्रभागातील रस्ते, उद्यान, स्वच्छ्ता, विद्युत या विभागातील काही समस्या सोडविण्यासाठी आयुक्तांना विनंती केली. शेखर काटे यांनी दापोडी प्रभागातील समस्या सोडविण्यासाठी होत असलेल्या विलंबाबत मुद्दा उपस्थित केला. तसेच अक्षय माछरे यांनी त्यांच्या प्रभागातील प्रलंबित झोपडपट्टीचा प्रश्न तसेच शहरातील रुग्णालयातील अत्यावश्यक प्रश्न मांडले. त्याचबरोबर काही विकासकामात होत असलेल्या भ्रष्टाचाराचीही त्यांनी पोलखोल केली.

प्रसाद कोलते यांनी त्यांच्या निगडी यमुनानगर प्रभागातील रस्ते, मोकाट जनावरे आणि श्वान, वाहतूक कोंडी तसेच उद्यान आणि इतर विविध विकासकामे याबाबत सविस्तर मुद्देसूद मांडणी केली. मंगेश असवले यांनी दिघी येथील अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या रस्त्याचा प्रश्न मांडला. अजय तेलंग यांनी मागासवर्गीय समाजातील नागरिकांना मिळणाऱ्या पालिकेच्या योजनांबाबत महत्त्वपूर्ण मुद्दे उपस्थित केले.

जवळपास दीड तास चाललेल्या बैठकीत सर्व युवक पदाधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागातील प्रमुख आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी केली. सर्व प्रश्नांवर महापालिका आयुक्त श्री शेखर सिंह यांनीही सकारात्मक चर्चा करत युवकांना आगामी काही काळात हे प्रश्न मार्गी लावण्याबाबत आश्वस्त केले. यावेळी युवकांकडून उपमुख्यमंत्री अजितदादा पवार युवा नेते पार्थ दादा पवार यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी अजित दादा पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर, प्रदेश सरचिटणीस व पुणे प्रभारी श्री विशाल काळभोर, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शेखर काटे, शहर उपाध्यक्ष प्रसाद कोलते, शहर उपाध्यक्ष तुषार ताम्हाणे, सरचिटणीस अक्षय माछरे, चेतन फेंगसे, प्रतीक साळुंखे, मंगेश आसवले, अजय तेलंग, समीर शेख आणि इतर युवक पदाधिकारी उपस्थित होते.