भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते रहाटणीत MNGLच्या कामाचे उदघाटन

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते रहाटणीत MNGLच्या कामाचे उदघाटन
  • सहा वर्षांपासून रखडलेल्या कामाला देविदास आप्पा तांबे यांच्यामुळे पुन्हा सुरवात

पिंपरी : रहाटणी प्रभाग क्रमांक २७ मधील MNGLच्या (महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड) कामाचे रविवारी (दि. ३० जुलै) भाजपचे नूतन शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. सरपंच फाउंडेशनचे अध्यक्ष देविदास आप्पा तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या कामाचा शुभारंभ झला आहे.

यावेळी भाजपचे पदाधिकारी दिपक जाधव, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे यांच्यासह रहाटणीतील विविध सोसायट्यांचे अध्यक्ष व रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात रहाटणीतील दहा सोसायट्यांमधील सुमारे २ हजार फ्लॅट धारकांना याचा फायदा झाला असून दुसऱ्या टप्प्यातही २ हजार फ्लॅट धारकांना याचा फायदा मिळणार आहे.

याप्रसंगी बोलताना देविदास तांबे म्हणाले की, मागील सहा वर्षांपासून हे MNGLचे काम रखडलेले आहे. हे काम कोणी आणि का रखडवले होते याची कल्पना रहाटणीतील सुजाण नागरिकांना आहे. त्यामुळे हे काम पूर्ण व्हावे यासाठी मी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा या सोसायटीधारकांची होती.

भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते रहाटणीत MNGLच्या कामाचे उदघाटन

त्यानुसार मागील वर्षभरापासून मी स्वतः भाजपचे आमदारअश्विनी ताई जगताप व विद्यमान शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करत होतो. हा पाठपुरावा करत असताना अनेक विघ्नसंतोषी मंडळींकडून या कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न झाला. मात्र शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या सहकार्याने हा प्रश्न मार्गी लावण्यात तसेच रहाटणीकरांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला तो सार्थ ठरविण्यात मला यश मिळाले, याबाबत देविदास तांबे यांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, हे काम मार्गी लागावे यासाठी पाठपुरावा केल्याबद्दल शंकर जगताप यांनी देविदास तांबे यांचे कौतुक केले तर सर्व सोसायटीधारकांनी त्यांचे आभार मानले.