बेंगलोरमधील भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा सहभाग

बेंगलोरमधील भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचा सहभाग
  • भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात जनजागृती करण्याचा केला निर्धार

लोकमराठी न्यूज : बेंगलोर येथे भारतीय युवक काँग्रेसतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘ बेहतर भारत कि बुनियाद ‘ या तीन दिवसीय अधिवेशनात पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसने आपला सहभाग नोंदविला. या अधिवेशनात भारतातल्या सुमारे ३००० युवकांनी भाग घेतला. भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात सामान्य माणसात जनजागृती करणे, बेरोजगार आणि महागाई विरोधात रस्त्यावर उतरून संघर्ष करणे आणि भाजपच्या खोट्या प्रचाराविरोधात लढा देणे या त्रिसूत्रीवर भर देण्याचा निर्धार या अधिवेशनात करण्यात आला.

मणिपूर येथील झालेल्या घटनांचा अधिवेशनात तीव्र शब्दात धिक्कार करण्यात आला असून भारतीय युवक काँग्रेस शोषित, पीडित महिलांच्या मागे ठाम पाने उभे असल्याची ग्वाही या अधिवेशनाच्या माध्यमातून देण्यात आली. भारत जोडो यात्रा हि आयडिया ऑफ इंडियाच्या रक्षणासाठी काढण्यात आलेली असून भारताच्या संविधानाच्या रक्षण करण्याचे काम काँग्रेसने केले आहे. भविष्यात काँग्रेस त्यासाठी कटिबद्ध आहे, याची ग्वाही या निमित्ताने देण्यात आली.

या अधिवेशनाद्वारे युवक काँग्रेसने आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले आहे. राहुल गांधी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे युवकांना संबोधित केले. या राष्ट्रीय अधिवेशनासाठी पिंपरी चिंचवड शहरातून युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष कौस्तुभ नवले, उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे महासचिव अनिकेत नवले, प्रदेश सचिव गौरव चौधरी, जिल्हा सरचिटणीस वसीम शेख, विनिता तिवारी, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतीक जगताप, चिंचवड विधानसभा अध्यक्ष रोहित शेळके, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख, जिल्हा सोशल मिडिया समन्वयक जय ठोंबरे व इतर युवक पदाधिकारी उपस्थित होते.