अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख यांचा जनतेला स्टॅम्पपेपरवर जाहीरनामा
चिंचवड, दि. २० फेब्रुवारी २०२३ : आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रबोधन, जनजागृती, आंदोलनाच्या माध्यमातून अनेक सामाजिक प्रश्न सोडवले आहेत. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम करीत असताना अनेक मर्यादा येत असल्याने राजकीय भूमिका घेऊन २०५ चिंचवड विधानसभा निवडणूक लढवत आहे. राजकीय पक्षांचे नेते निवडणुकीच्या तोंडावर खोटी आश्वासने देतात. मात्र, या गोष्टींना फाटा देत मी जनतेसाठी जाहीरनामा स्टॅम्प पेपरवर लिहून नोटराइज्ड करून जनतेसमोर सादर केला असून यामध्ये मतदार संघातील १२ मुद्दे मांडलेले आहेत. अशी माहिती अपना वतन संघटनेचे पुरस्कृत अपक्ष उमेदवार सिद्दीक शेख यांनी सोमवारी (दि. २०) थेरगाव येथे पत्रकार परिषदेत दिली.
चिंचवड विधानसभा मतदार संघातून अपक्ष उमेदवार म्हणून अपना वतन संघटनेचे अध्यक्ष सिद्दीक शेख निवडणूक लढवीत आहेत. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर चिखलफेक करू...