भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश

भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश

पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसी मधील इंडस्ट्रीज उद्योजक व कामगार यांनी आम आदमी प्रवेश केला. आपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते व आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल महादेव टाकळे (दिघी), सुरेश बाबू कांबळे (भोसरी), गौतम भगवान इंगळे (काळेवाडी), सुनील सूर्यकांत शिवशरण (भोसरी), पांडुरंग जगन्नाथ राऊत (भोसरी), बालाजी शामराव कांबळे (भोसरी), राहुल झोटिंग कांबळे (मोशी) आदींनी प्रवेश केला.

या वेळी आप पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, आप डाॅक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, आप महिला नेत्या सिता केंद्रे, कमलेश रनावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंडस्ट्रीज उद्योजक पांडुरंग राऊत, सुरेश कांबळे व आनिल टाकळे यांनी भाजप सरकार वरती नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जाणे हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, येणाऱ्या काळात महाराष्ट्रातील जनता भाजपला सत्तेतून पायउतार केल्याशिवाय राहणार नाही. असे मत त्यांनी व्यक्त केले.