Tag: Aam Adami Party

भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

भोसरीमधील इंडस्ट्रीज उद्योजकांनी केला आम आदमी पार्टीत प्रवेश

पिंपरी चिंचवड : भोसरी एमआयडीसी मधील इंडस्ट्रीज उद्योजक व कामगार यांनी आम आदमी प्रवेश केला. आपचे महाराष्ट्र प्रदेश निवडणूक प्रभारी व गोव्याचे माजी मंत्री महादेव नाईक यांच्या हस्ते व आप राज्य संघटक विजय कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत अनिल महादेव टाकळे (दिघी), सुरेश बाबू कांबळे (भोसरी), गौतम भगवान इंगळे (काळेवाडी), सुनील सूर्यकांत शिवशरण (भोसरी), पांडुरंग जगन्नाथ राऊत (भोसरी), बालाजी शामराव कांबळे (भोसरी), राहुल झोटिंग कांबळे (मोशी) आदींनी प्रवेश केला. या वेळी आप पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट, आप डाॅक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे, आप महिला नेत्या सिता केंद्रे, कमलेश रनावरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी इंडस्ट्रीज उद्योजक पांडुरंग राऊत, सुरेश कांबळे व आनिल टाकळे यांनी भाजप सरकार वरती नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जाणे हे...
खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित
पुणे, राजकारण

खासदार संजय सिंग उद्या पुण्यात ; महाराष्ट्र युवा अधिवेशनाला करणार संबोधित

पुणे : आम आदमी पार्टी युवा आघाडीचे महाराष्ट्र युवा अधिवेशन रविवारी (ता. ३१ जुलै) बिबवेवाडी येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात होत आहे. या अधिवेशनाला आम आदमी पार्टीचे ज्येष्ठ नेते व राज्यसभा खासदार संजय सिंग (Sanjay Singh) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे 'आप' युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. खा. संजय सिंग यांच्याबरोबरच दिल्ली विधानसभेचे सर्वात तरुण आमदार कुलदीप कुमार व गोव्याचे आमदार वेंझी वेगस यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती असणार आहे. या अधिवेशनामध्ये रोजगार, शिक्षण, आरोग्य, राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांचा सहभाग या काही प्रमुख विषयांवर चर्चा होणार असल्याचे युवा आघाडी उपाध्यक्ष व अधिवेशनाचे समन्वयक संदीप सोनवणे यांनी सांगितले. खा. संजय सिंग यांचे आगमन सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी पुणे विमानतळावर आगमन होणार असून ते 11:15 वाजता बिबवेवा...
शहरातील असंख्य खड्ड्यांमध्ये दडले मोठे अर्थकारण ; शहरातील खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे – आप
पिंपरी चिंचवड

शहरातील असंख्य खड्ड्यांमध्ये दडले मोठे अर्थकारण ; शहरातील खड्डे, भ्रष्टाचाराचे अड्डे – आप

जाणीव पुर्वक निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे रस्त्यावर खड्डे- आपचा आरोप लोकप्रतिनिधी, अधिकारी, ठेकेदार यांची रोजगार हमी योजना आहे काय? आपचा सवाल रिजेक्शन चार्जेस लावून मोफत दुरुस्ती करून घ्यावी : चेतन बेंद्रे पिंपरी चिंचवड : महापालिकेचा बांधकाम विभाग दरवर्षी रस्ते बांधतो. या रस्त्यांचे बांधकाम नेहमीप्रमाणे निकृष्ट दर्जाचेच केले जाते. रस्ते विकास ही अहोरात्र सुरू असणारी रोजगार योजना लोकप्रतिनिधी, अधिकारी, आणि ठेकेदारयांनी राबवली आहे. महापालिकेचे सुमारे ६००० कोटींचे बजेट आहे. त्यातील सुमारे १२०० ते १५०० कोटी रूपये फक्त स्थापत्य कामासाठी आहेत. स्मार्ट सिटीच्या नियोजनात करदात्यांना खड्डे मुक्त रस्ते मिळावेत अशी अपेक्षा असते. मुळात या शहरात किती रस्ते आहेत याचे हिस्ट्री कार्ड आता नागरिकांना मिळाले पाहिजे. २०१७ पासून शहरात उड्डाणपूल, रस्ता रुंदीकरण, काँक्रीटीकरण, डांबरीकरण यासाठ...
मध्यप्रदेशात आम आदमी पक्षाचा महापौर
राष्ट्रीय, मोठी बातमी

मध्यप्रदेशात आम आदमी पक्षाचा महापौर

भोपाळ, ता १८ : दिल्ली, पंजाब नंतर आता इतर राज्यात आम आदमी पक्षाचा प्रभाव वाढताना दिसत आहे. मध्यप्रदेशातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने (Aam Aadmi Party) एक महापौरपद जिंकले आहे. राज्यातील ११ पैकी सहा ठिकाणी भाजपने महापौरपद जिंकले आहे. तर काँग्रेसला तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. सिंगरौली येथील महापौरपदी आम आदमी पक्षाचा (Aap) उमेदवार विजयी झाला आहे. भाजपला इंदूर, बुऱ्हाणपूर, सतना, खंडवा, सागर तसेच उज्जैन येथे महापौरपदे जिंकता आली. काँग्रेसला ग्वाल्हेर, जबलपूर तसेच छिंदवाडा येथे महापौरपदी विजय मिळवता आला. छिंदवाडा हा कमलनाथ यांचा बालेकिल्ला तेथे काँग्रेसने आपला प्रभाव राखला. ग्वाल्हेरमध्ये मात्र, भाजपला (BJP) धक्का बसला आहे. गेल्या वेळी काँग्रेसला (Congress) एकही महापौरपद जिंकला आले नव्हते. त्यातुलनेत त्यांची कामगिरी चांगली झाली आहे. ...
पठाणी वसुली करणारी ‘पे अँड पार्क’ योजना बंद करा ; अन्यथा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा
पिंपरी चिंचवड

पठाणी वसुली करणारी ‘पे अँड पार्क’ योजना बंद करा ; अन्यथा आम आदमी पार्टीचा आंदोलनाचा इशारा

पिंपरी : शहरामधील महानगरपालिकेची पे अँड पार्क योजना तातडीने बंद करण्यात यावी. असे निवेदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त वाघ यांना आम आदमी पार्टीच्या वतीने शहराध्यक्ष अनुप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली देण्यात आले. यावेळी आम आदमी पार्टी सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष वहाब शेख, महिला अध्यक्ष स्मिता पवार, पिंपरी चिंचवड संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, प्रवक्ते प्रकाश हागवणे, डॉक्टर विंग अध्यक्ष अमर डोंगरे आदी उपस्थित होते. निवेदनात असे म्हटले आहे की, केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नागरिक त्रस्त असताना पिंपरी चिंचवडचे महापौर, पालिका सत्ताधारी भाजपकडून शहरवासीयांच्या खिशाला कात्री लागणारी धोरणे राबविली गेली आहेत. भ्रष्टाचारी कारभारामुळे करदात्यांच्या करोडो रुपयांचा भाजपच्या नेतृत्वाखाली चुराडा केला आहे, तरी देखील शहर वाशियांकडून पैसे काढून ...
भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश
पिंपरी चिंचवड, राजकारण

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश हगवणे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, आप शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, ब्रह्मानंद जाधव, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रकाश हगवणे यांनी गेली वीस वर्ष भाजपमध्ये काम केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप पूर्वीसारखा मुंडे व महाजन यांचा पक्ष राहिला नाही, पक्षाची विचारधारा बदलली आहे. प्रदेश पातळीवरील निष्ठावंत नेते ते निष्ठावंत प्रभाग कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांवरती पक्षाने अन्याय केला आहे. येणाऱ्या काळातही बरेच कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत. मी अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीमधील काम बघून प्रेरित होऊन आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत मोहननगर, आनंदनगर, इंदिरानगर, प्रभाग क्रमांक १९ मधून...
लेखी नोटीस दिल्याशिवाय विज मीटर कनेक्शन तोडू नये : आप
पिंपरी चिंचवड

लेखी नोटीस दिल्याशिवाय विज मीटर कनेक्शन तोडू नये : आप

राज्य सरकारचे दुर्लक्ष आणि महावितरण ची हुकूमशाही : आप पिंपरी : विद्युत अधिनियमातील कलम ५६ मधील तरतुदीनुसार, विज बिलाची रक्कम भरण्याची जी मुदत दिलेली असते, त्या मुदतीपर्यंत ग्राहकाने बिल भरले नाही, तर विज कंपनीने ग्राहकास १५ दिवसांची डिस्कनेक्शन नोटीस देणे बंधनकारक आहे. परंतु, असे असूनही महावितरणचे कर्मचारी ग्राहकांची विज परस्पर तोडत आहेत. तरी या प्रकारामध्ये आपण लक्ष देऊन संबंधित कर्मचाऱ्यांना १५ दिवसाची डिस्कनेक्शन नोटीस देण्याची सूचना करावी. अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने महावितरणचे कार्यकारी अभियंते उदय भोसले यांना केली. सामान्य नागरिक जर आपले बील सातत्याने व रेग्युलर भरत असेल व पहिलेच बिल काहीकारणाने भरणे अशक्य झाले त्यात महावितरणचीही कारणे असतात. अशा परिस्थितीत विज कनेक्शन न तोडता सतत दोन महिने बिल न भरल्यासच नंतर कारवाई व्हावी, तसेच नोटीस/ सूचना /१-२ दिवसाचा तरी अवध...
संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आकुर्डीत आम आदमी पार्टीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
पिंपरी चिंचवड

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आकुर्डीत आम आदमी पार्टीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पिंपरी : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने आकुर्डी येथील गुरुदेव नगर भागामध्ये नेत्र तपासणी, शुगर, बीपी तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिराला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी आपचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलताना सांगितले की, आपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन साजरे केले जातात. दिल्लीमध्ये शिक्षण,आरोग्य, लाईट, पाणी या मूलभूत गरजा तेथील जनतेला मोफत दिल्या जातात. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये तसेच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे. जनता महागाईमुळे त्रस्त आहे, कररुपी मिळालेल्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. पाहिजे...
आम आदमी पार्टी आयोजित ‘आपला चषक २०२१’ मध्ये ६४ पैकी चार संघांनी मारली बाजी
पिंपरी चिंचवड

आम आदमी पार्टी आयोजित ‘आपला चषक २०२१’ मध्ये ६४ पैकी चार संघांनी मारली बाजी

पिंपरी : आम आदमी पार्टी आयोजित पिंपरी चिंचवड शहर स्तरीय 'आपला चषक 2021' प्लास्टिक बॉल अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड मनपा शाळेच्या मैदानात संपन्न झाल्या. पाच दिवस चाललेल्या या स्पर्धा मध्ये संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातून 64 संघांनी सहभाग घेतला होता. श्रीराम स्पोर्ट्स क्लब, रिस्की बॉईज, साई समर्थ प्रतिष्ठान,डिफेंन्डर स्पोर्ट्स क्लब या संघांनी प्रथम चार बक्षिसे पटकावली. उत्कृष्ट फलंदाज शुभम गायकवाड, उत्कृष्ट गोलंदाज संदीप काळभोर, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सुरज पाटोळे, विशेष खेळाडू सचिन मोकाशी, विशेष सहभागी संघ ओम साई प्रतिष्ठान यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. बक्षिस वितरण समारंभास आम आदमी पार्टी प्रदेश संघटक विजय कुंभार, प्रदेश सचिव धनंजय शिंदे, पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख संदीप देसाई, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद कीर्दत, संदीप सोनावणे यांच्या हस्त...
महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन
पिंपरी चिंचवड

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन

पिंपरी : भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व तेजस्वी विचार पिढ्यानपिढ्यासाठी मार्गदर्शक आहेत. समस्त बहुजन समाजाचे उध्दारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्या विचारांवर चालण्याचा निर्धार करू असे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाची मान उंचावली, अर्थातच गोरगरीब बहुजन समाजातील जनतेने हे विचार आत्मसात करत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले पाहिजे बहुजन समाजाची मुल...