भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश

भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचा आम आदमी पार्टीत प्रवेश

चिंचवड : भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते प्रकाश हगवणे यांनी आम आदमी पार्टीत प्रवेश केला. यावेळी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, आप शहर संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, ब्रह्मानंद जाधव, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रकाश हगवणे यांनी गेली वीस वर्ष भाजपमध्ये काम केले. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, भाजप पूर्वीसारखा मुंडे व महाजन यांचा पक्ष राहिला नाही, पक्षाची विचारधारा बदलली आहे. प्रदेश पातळीवरील निष्ठावंत नेते ते निष्ठावंत प्रभाग कार्यकर्त्यांपर्यंत सर्वांवरती पक्षाने अन्याय केला आहे. येणाऱ्या काळातही बरेच कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकणार आहेत. मी अरविंद केजरीवाल यांचे दिल्लीमधील काम बघून प्रेरित होऊन आज आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश केला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीत मोहननगर, आनंदनगर, इंदिरानगर, प्रभाग क्रमांक १९ मधून ते आम आदमी पार्टीकडून निवडणूक लढविणार असल्याचे बोलले जात आहे.