प्रा. अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान

प्रा. अर्जुन भागवत यांना पीएच.डी. पदवी प्रदान

हडपसर (प्रतिनिधी) : रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमधील वाणिज्य विद्याशाखेचे विभागप्रमुख प्रा. डॉ. अर्जुन भानुदास भागवत यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अंतर्गत पीएच. डी. पदवी प्रदान करण्यात आली.

प्रा. डॉ.अर्जुन भागवत यांचा संशोधनाचा विषय “शैक्षणिक संस्थांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या कल्पक प्रकल्पांचे व्यवस्थापन : एक तुलनात्मक अभ्यास ” हा होता. नेस वाडिया कॉलेज ऑफ कॉमर्समधील अकाउंटन्सी विभागाचे विभागप्रमुख प्रा. डॉ. मनोहर सानप यांनी त्यांना मार्गदर्शन केले.

त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय विकास समितीचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे, आय. क्यु .ए. सी प्रमुख प्रा. डॉ. किशोर काकडे, उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य प्रा. संजय जडे तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी यांनी त्यांचे अभिनंदन केले.