राहुल गांधींचे काय चुकले? –जेट जगदीश
राहुल गांधींनी सावरकरांवर केलेल्या टीकेवरून वाद निर्माण करून महाराष्ट्रात भाजपेईंनी मोठ्या प्रमाणात राहुल गांधींना 'जोडे मारो' (Bharat Jodo Yatra) कार्यक्रमही राबवला. या कार्यक्रमासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झालाय. त्यात आंदोलनकर्तीने राहुल गांधींना (Rahul Gandhi) जोडे मारण्याच्या ऐवजी सावरकरांवरच जोडे मारण्यासाठी हात उगारला होता असे हास्यास्पद चित्र दिसले. बरे तर बरे, बाकीच्या कार्यकर्त्यांनी तिला ताबडतोब अडवले म्हणून. नाहीतर बिचाऱ्या सावरकरांची काही धडगत नव्हती. त्यांनाच चपलांचा मार बसला असता. याचा अर्थ भाजपने सावरकर आणि राहुल गांधी यांना ओळखता न येणारे भाडोत्रीआंदोलनकर्ते मागवले होते की काय?
दुसरे म्हणजे सावरकरांच्या (V D Savarkar) विरोधात मोठ्या प्रमाणात जाहीरपणे वक्तव्य करणे केव्हा सुरू झाले याबद्दल भाजपने जरूर चिंतन करायला हवे. 2014 पूर्वी सावरकरांविषयी अशा पद्धती...