संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आकुर्डीत आम आदमी पार्टीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

संत गाडगेबाबा पुण्यतिथीनिमित्त आकुर्डीत आम आदमी पार्टीतर्फे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पिंपरी : संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने आकुर्डी येथील गुरुदेव नगर भागामध्ये नेत्र तपासणी, शुगर, बीपी तपासणी व चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला. या शिबिराला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला.

यावेळी आपचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलताना सांगितले की, आपच्या वतीने सर्व महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथीचे कार्यक्रम नेहमी विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन साजरे केले जातात. दिल्लीमध्ये शिक्षण,आरोग्य,

लाईट, पाणी या मूलभूत गरजा तेथील जनतेला मोफत दिल्या जातात. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिंपरी-चिंचवडमध्ये तसेच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.

महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे. जनता महागाईमुळे त्रस्त आहे, कररुपी मिळालेल्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे. पाहिजे तशा सुखसुविधा पिंपरी-चिंचवड करांना मिळत नाहीत, आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडमध्ये जनतेच्या हितासाठी असे कार्यक्रम नेहमीच घेत असते व यापुढे घेत राहील. आम्ही आपच्या वतीने संत गाडगेबाबांना पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन करत आहोत, असे आम आदमी पार्टीचे कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट यांनी बोलताना म्हटले. या शिबिराच्या वेळी अकुर्डी व गुरुदेव नगर भागातील ज्येष्ठ नागरिक व आपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.