महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आम आदमी पार्टीतर्फे अभिवादन

पिंपरी : भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम आदमी पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य व तेजस्वी विचार पिढ्यानपिढ्यासाठी मार्गदर्शक आहेत. समस्त बहुजन समाजाचे उध्दारकर्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या विचारांचे स्मरण करून त्या विचारांवर चालण्याचा निर्धार करू असे आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी म्हटले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी उच्च शिक्षण घेऊन देशाची मान उंचावली, अर्थातच गोरगरीब बहुजन समाजातील जनतेने हे विचार आत्मसात करत आपल्या मुलांना उच्च शिक्षण दिले पाहिजे बहुजन समाजाची मुलं डॉक्टर आयएस वकील मोठे अधिकारी झाले पाहिजे शिका संघटित व्हा संघर्ष करा हे बाबासाहेबांचे विचार आचरणात आणले पाहिजेत असे आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट यांनी म्हटले.

यावेळी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, संपर्कप्रमुख वैजनाथ शिरसाट, सर्फराज मुल्ला, आपचे युवा कार्यकर्ते ब्रह्मानंद जाधव, आशुतोष शेळके, सामाजिक कार्यकर्ते डॉ. रामेश्वर मुंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.