Tag: Aam Adami Party

महात्मा ज्योतिराव फुले यांना आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन
सामाजिक

महात्मा ज्योतिराव फुले यांना आम आदमी पार्टीच्या वतीने अभिवादन

पिंपरी : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त पिंपरी येथील त्यांच्या पुतळ्यास आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवडच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या वेळी आम आदमी पार्टीचे सहसंघटक वहाब शेख, पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष महेश बिराजदार, वैजनाथ शिरसाट, यशवंत कांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते शहरकोअर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट बोलताना म्हणाले की, "सामाजिक समतेचे पुरस्कर्ते, स्त्रीशिक्षणाचे प्रणेते, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले यांनी बहुजन समाजाला शिक्षणाचे महत्व पटवून सन्मानाने जगण्याचा मार्ग दाखवला. स्त्रीयांसाठी शिक्षणाची दारे खुली करुन त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. अज्ञान, अंधश्रद्धा, अस्पृश्यता, जातीभेद, धर्मव्यवस्थेच्या गुलामगिरीतून समाजाला बाहेर काढून वैचारिक, सामाजिक क्रांती घडवली. राज्यकर्त्यांनी शेतकरी, बहुजन समाजाला केंद्रस्थानी ठेवून धोरणं आखली प...
संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप
पिंपरी चिंचवड, सामाजिक

संविधान दिनानिमित्त आम आदमी पार्टीतर्फे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊ वाटप

पिंपरी : आम आदमी पार्टीच्या वतीने संविधान दिनानिमित्त व आम आदमी पार्टीच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त नचिकेत बालग्राम विद्यामंदिर गुरुद्वारा वाल्हेकरवाडी येथील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूं व खाऊ वाटप करण्यात आले. तसेच आपच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून संविधानाच्या प्रास्ताविक प्रतिमेचे सामूहिक वाचन करण्यात आले. पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे अन्नदान करण्यात आले. या वेळी आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष अनुप शर्मा, कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, सामाजिक न्याय विंग अध्यक्ष वहाब शेख, कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट, माधुरी मठ, कपिल मोरे, ब्रह्मानंद जाधव, एकनाथ पाठक, अमर डोंगरे, आशुतोष शेळके, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ...
आम आदमी पार्टीतर्फे स्थापना दिनानिमित्त सावली निवारा केंद्रात अन्नदान
पिंपरी चिंचवड

आम आदमी पार्टीतर्फे स्थापना दिनानिमित्त सावली निवारा केंद्रात अन्नदान

पिंपरी : आम आदमी पार्टीच्या नवव्या स्थापना दिनानिमित्त पिंपरी-चिंचवड आम आदमी पार्टीच्या वतीने पिंपरी येथील सावली निवारा केंद्र येथे जेवण वाटप करण्यात आले. या आधी ही सावली निवारा केंद्रात अनेकदा भेट देऊन असे उपक्रम घेण्यात आले आहेत. आज सावली निवारा केंद्राचे प्रबंधक गौतम थोरात यांनी तिथल्या कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिका द्वारा संचालित ह्या केंद्रात राहणाऱ्या लोकांचे कौशल्य पाहून त्यांचा अभिमान वाटला. अनेकांशी आपुलीकीने गप्पा मारल्या. अस बोलतांना आप पिंपरी चिंचवड अध्यक्ष अनुप शर्मा यांनी सांगितले. तसेच २६ नोव्हेंबर संविधान दिनाचे महत्व आप पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी सांगितले, व 26 /11 मुंबई येथील झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला. आणि शहिदांना श्रद्धांजली वाहण्यात आली. आम आदमी पार...
आम आदमी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आकुर्डीत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
पिंपरी चिंचवड

आम आदमी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आकुर्डीत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पिंपरी : आम आदमी पार्टी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी मधील सुभाष पांढरकर नगर भागामध्ये नेत्र तपासणी शुगर बीपी तपासणी, चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला, या शिबिराला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या, पाच वर्षात एकही नगरसेवक आमच्या भागात फिरकला नाही किंवा कुठलीही योजना आमच्यापर्यंत पोचविली नाही. आम आदमी पार्टी करत असलेल्या कामाला शुभेच्छा दिल्या यावेळी आपचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलताना सांगितले दिल्लीमध्ये शिक्षण, आरोग्य, लाईट, पाणी या मूलभूत गरजा तेथील जनतेला मोफत दिल्या जातात. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिंपरी-चिंचवड मध्ये तसेच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे, जनता महागाई मुळे त्रस्त आहे कररुपी मिळालेल्या ज...
संविधानिक मार्गाने शेतकरी जिंकला अहंकार हरला : आम आदमी पार्टी
पिंपरी चिंचवड

संविधानिक मार्गाने शेतकरी जिंकला अहंकार हरला : आम आदमी पार्टी

पिंपरी : अखेर आज केंद्र सरकाने तीन काळे कृषी कायदे रद्द केले.हा शेतकऱ्यांचा खूप मोठा विजय आहे.भारताच्या लोकशाहीचाही हा ऐतिहासिक विजय आहे.आज संपूर्ण जगाला भारतातल्या शेतकऱ्यांनी दाखवून दिले की, शांततापूर्ण व लोकशाहीमार्गाने अन्यायाविरुद्ध लढा दिला तर न्याय मिळाल्याशिवाय राहत नाही. स्वतंत्र भारताच्या इतिहासातील हे शेतकरी आंदोलन सर्वात मोठे व दिर्घकाळ चाललेले आंदोलन होते.सरकारने आपली सर्व शक्ति पणाला लावून हे आंदोलन चिरडून टाकण्याचा ध्यास घेतला होता.परंतू त्या दडपशाहीपुढे शेतकऱ्यांचा दृढनिश्चय अजिंक्य ठरला.या लढ्यात शेकडोंना प्राण गमवावे लागले.लाखो शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. म्हणूनच हा संघर्ष भविष्यातील अनेक लोकशाहीविघातक शक्तींविरुद्ध लढा देण्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. कृषी कायदे मागे घेणे ही भाजपाची राजकीय खेळी असली तरी अंतिमत: भारतीय लोकशाहीचा विजय झाला आहे, ...
हुकूमशहाला अखेर बळीराजाने झुकवलेच : चेतन गौतम बेंद्रे
पिंपरी चिंचवड, राजकारण

शिवशाहीच्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का? : आप
पिंपरी चिंचवड

शिवशाहीच्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागणूक का? : आप

पिंपरी : राज्यातील एस. टी. कर्मचाऱ्यांनी वेतनवाढी सह एस. टी. महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला आम आदमी पार्टी, महाराष्ट्राने पाठींबा घोषीत केला आहे. वल्लभनगर आगारामध्ये चालू असलेल्या आंदोलमध्ये आम आदमी पार्टी, पिंपरी चिंचवड च्या पदाधिकाऱ्यांनी पत्र देऊन जाहीर पाठिंबा दिला. एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्वलंत व रास्त असुन त्या सोडविण्याकरीता राज्य शासनाकडून सातत्याने होणारी दिरंगाई, संपाबाबत सकारात्मक भुमीका नसल्यामुळे, गावोगावी पोहोचलेली लालपरीचं खाजगीकरणाकडे होणारी वाटचाल पाहून आम आदमी पार्टी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठींबा देत आहे व राज्य शासनाला विनंती करते की संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कठोर कार्यवाही करू नये. आंदोलनांच्या ठिकाणी बोलताना "शिवशाही च्या राज्यात एस.टी. कर्मचाऱ्यांशी मोगलशाही सारखी वागण...