आम आदमी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आकुर्डीत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

आम आदमी पार्टीच्या वर्धापन दिनानिमित्त आकुर्डीत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न

पिंपरी : आम आदमी पार्टी वर्धापन दिनाचे औचित्य साधून आकुर्डी मधील सुभाष पांढरकर नगर भागामध्ये नेत्र तपासणी शुगर बीपी तपासणी, चष्मे वाटप कार्यक्रम घेण्यात आला, या शिबिराला नागरिकानी उस्फूर्त प्रतिसाद दिला. काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिल्या, पाच वर्षात एकही नगरसेवक आमच्या भागात फिरकला नाही किंवा कुठलीही योजना आमच्यापर्यंत पोचविली नाही. आम आदमी पार्टी करत असलेल्या कामाला शुभेच्छा दिल्या

यावेळी आपचे पिंपरी-चिंचवड कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांनी बोलताना सांगितले दिल्लीमध्ये शिक्षण, आरोग्य, लाईट, पाणी या मूलभूत गरजा तेथील जनतेला मोफत दिल्या जातात. अरविंद केजरीवाल यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही पिंपरी-चिंचवड मध्ये तसेच काम करण्याचा प्रयत्न करत आहोत.

महाराष्ट्र सरकार व पिंपरी चिंचवड महानगरपालिका भ्रष्टाचाराने बरबडली आहे, जनता महागाई मुळे त्रस्त आहे कररुपी मिळालेल्या जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात आहे, पाहिजे तशा सुखसुविधा पिंपरी-चिंचवड करांना मिळत नाहीत, आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवडमध्ये जनतेच्या हितासाठी असे कार्यक्रम नेहमीच घेत असते व यापुढे घेत राहील. असे आम आदमी पार्टीचे कोर कमिटी सदस्य वैजनाथ शिरसाट यांनी बोलताना म्हटले.

या शिबिराच्या वेळी सुभाष पांढरकर नगर मधील जुने जाणकार व सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पांढरकर, शंभूराजे पांढरकर, यांचा आपच्या वतीने सत्कार करण्यात आला. वैजनाथ शिरसाट यांनी शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी पांढरकर नगर मधील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी व आपचे चेतन बेंद्रे, एकनाथ पाठक, आशुतोष शिंदे, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते