भाजप आणि महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचा फूटबॉल केला – आप
पिंपरी : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि भाजप (BJP) दोघे ओबीसी आरक्षणासंदर्भात गंभीर नव्हते आणि फक्त एकमेकांवर चिखलफेक करत होते. भाजप आणि महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षणाचा फूटबॉल केला आहे. अशी टिका आम आदमी पार्टीचे (Aam Adami Party) शहर कार्याध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केली आहे.
चेतन बेंद्रे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेश हा नाकारता येणार नाही, पण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळालेच पाहिजे. ही आम आदमी पार्टीची मागणी पहिल्यापासून राहिली आहे आणि या पुढे ही राहील.
बेंद्रे पुढे म्हणाले की, पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूकीसंदर्भात आम आदमी पार्टी तयार आहे आणि सर्व जागा लढवविणार आहे. आप महानगरपालिकेची निवडणूक पहिल्यांदाच लढवत असून लोकांना अरविंद केजरीवाल यांचे शिक्षण, आरोग्यावर आधारित दिल्ली मॉडेल मनात भरले आहे. संपूर्ण ...