महात्मा ज्योतिबा फुले यांना आपच्या वतीने अभिवादन

महात्मा ज्योतिबा फुले यांना आपच्या वतीने अभिवादन

पिंपरी : आम आदमी पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी आम आदमी पार्टीचे अशोक तनपुरे, डॉ. अमर डोंगरे, सामाजिक कार्यकर्ते सुधाकर फुले, सुभाष माच्छरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

या वेळी बोलतांना आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड संपर्क प्रमुख वैजनाथ शिरसाट म्हनाले की, प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला तेच पोहू शकतात ज्यांचे निर्धार ठाम असतात, ज्यांना कुठलेतरी ध्येय गाठायचे असते. असे म्हणणाऱ्या ज्योतीबांनी

२४ सप्टेंबर १८७३ रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे, हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्या बरोबर १९ स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य सुरू केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत ही चळवळ पोहोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला. ‘सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥’ हे या समाजाचे घोषवाक्य होते. सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. असे त्यांनी म्हटले.

स्त्रियांना शिक्षणाचा हक्क मिळवून देणे, बालविवाहाला विरोध करणे, विधवा पुनर्विवाहाला पाठिंबा देणे हे ज्योतिबांचे मूळ उद्दिष्ट होते. समाजातील कुप्रथा आणि अंधश्रद्धेच्या जाळ्यातून समाजाची मुक्तता फुले यांना करायची होती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षण देण्यात, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यात घालवले. असे सामाजिक न्याय विंग जिल्हा अध्यक्ष वहाब शेख यांनी म्हटले.