न्यू प्राईट स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

न्यू प्राईट स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी

रहाटणी : येथील क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात करण्यात आली.

यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका असावरी घोडके, पुरुषोत्तम गाणार युवराज प्रगणे तात्या शिनगारे व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस हार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिक्षकांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक पैलूवर शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक सचिन कळसाईत व सुनंदा साळवी यांनी आभार मानले.