एस.एम. जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन संपन्न

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन संपन्न

हडपसर (प्रतिनिधी) : एस.एम.जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन कार्यक्रम सांस्कृतिक विभाग आणि स्टाफ वेल्फेअर कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभागप्रमुख डॉ. दिनकर मुरकुटे यांनी समतावादी आणि विषमतावादी भारतीय जीवन प्रवाहाचा आढावा घेतला.

कर्मवीरांच्या आणि लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या त्यागावरच रयत शिक्षण संस्थेची उभारणी झाली आहे. महात्मा फुले यांचे सत्यशोधक चळवळीची विचारधारा पुढे कर्मवीर आणि रयतमाऊली यांनी सुरु ठेवली. त्यांच्या त्यागामुळेच बहुजन समाज शिक्षणाच्या प्रवाहात आला. असे विचार डॉ. दिनकर मुरकुटे यांनी व्यक्त केले.

एस.एम. जोशी कॉलेजमध्ये रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतीदिन संपन्न

रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी केलेला त्याग रयत शिक्षण संस्थेच्या जडणघडणीत व बहुजन समाजासाठी खूप मोलाचा ठरला. लक्ष्मीबाई यांनी वसतिगृहातील सर्व मुलांची आई म्हणून सेवा केली. प्रसंगी सौभाग्याचे प्रतीक असलेले मंगळसूत्र विकले. आणि मुलांच्या जेवणाची सोय केली. त्यांच्या या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे असे विचार प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांनी अध्यक्षीय मनोगतात व्यक्त केले.

रयत माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयात व वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी खीर वाटप करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. राजेंद्र ठाकरे यांनी तर पाहुण्यांचा परिचय व स्वागत सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. शिल्पा शितोळे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार डॉ. अशोक पांढरबळे यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. विश्वास देशमुख यांनी केले. कार्यक्रमासाठी उपप्राचार्य डॉ. संजय जगताप, उपप्राचार्य संजय जडे, आय.क्यु.ए.सी. विभागाचे समन्वयक डॉ. किशोर काकडे, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.